Siddharth-Mitali Kelvan Photos: सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांचंं पहिलं केळवण ईशा केसकरच्या घरी; पहा फोटोज
मराठी सिनेजगतामधील क्युट कपल सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (mitali Mayekar) यांचा लवकरच विवाह सोहळा पार पडणार आहे. 2019 मध्ये साखरपुडा झाल्यानंतर आता ही जोडी लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे.
दिवाळी आणि तुळशीचं लग्न लागल्यानंतर आता लगीनसराई सुरू झाली आहे. यामध्ये कलाकार मंडळींचा देखील समावेश आहे. मराठी सिनेजगतामधील क्युट कपल सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (mitali Mayekar) यांचा लवकरच विवाह सोहळा पार पडणार आहे. 2019 मध्ये साखरपुडा झाल्यानंतर आता ही जोडी लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. लग्नापूर्वी केळवण करण्याची पद्धत असते. नुकतच ईशा केसकरच्या (Isha Keskar) घरी सिद्धार्थ मिताली चं पहिलं केळवण पार पडलं आहे. इंस्टाग्रामवर कलाकार मंडळींनी या छोटेखानी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
मागील अनेक वर्षांपासून अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर एकमेकांना डेट करत आहेत. साखरपुड्यानंतर आता वर्षभराने ही जोडी विवाहबंधनात अडकत आहे. सिद्धार्थ चांदेकरने देखील इंस्टाग्रामवर पहिल्या केळवणाचे फोटो सोशल मीडीयावर शेअर करत ' गेम ऑन' असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ -मितालीने अभिनेत्री अभिज्ञा भावे साठी देखील त्यांच्याकडे केळवण आयोजित केले होते. Siddharth Chandekar- Mitali Mayekar Engagement: मुंबईत पार पडला सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा, #SidMit च्या या खास सोहळ्यात मराठी सेलिब्रिटींची उपस्थिती.
सिद्धार्थ मितालीच्या केळवणाचे फोटो

सिद्धार्थ चांदेकर इंस्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
केळवणाच्या निमिताने लग्न ठरलेल्या वधू-वरांना घरी बोलावून त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा बेत केला जातो. त्यांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. सध्या मिताली आणि सिद्धार्थ दोघेही मराठी टेलिव्हिजनवर डेली सोपच्या माध्यमातून पहायला मिळत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2020 10:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

