Samjhe Kya Song: मराठी सिनेसृष्टीत हळूहळू आपल्या नावाप्रमाणे अभिनयातून प्रेक्षकांवर छाप पाडणारा अभिनय बेर्डे (Abhinay Berde) याचा आगामी चित्रपट 'अशी ही आशिकी' (Ashi Hi Ashiqui) मधील 'समझे क्या' (Samjhe Kya) हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. तर गाण्यातील रोमँटिक अंदाजातून अभिनय सोबत अभिनेत्री हेमल इंगळे (Hemal Ingle) झळकणार आहे. टीझरनंतर सिनेमातील हे दुसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.
'समझे क्या' हे गाणे प्रेमवीरांना उत्स्फुर्त करणारे आहे. यामधून अभिनय आणि हेमल या दोघांच्या नात्यात किती आनंद आणि मनमोकळेपणी असल्याचे जाणवते. निखळपणे हसणारे दोघेही प्रेक्षकांना हे गाणे पाहण्यासाठी भाग पाडणारे आहे. तर सोनू निगम (Sonu Nigam) आणि शनमुखप्रिया (Shanmukhpriya) यांनी गायले आहे. तसेच गाण्याचे बोल हे अभिषेक खानकर यांनी लिहिले आहेत. (हेही वाचा-Ashi Hi Ashiqui Song: 'अशी ही आशिकी' गाण्यात अभिनय बर्डे-हेमल इंगळे यांचा रोमांटिक अंदाज!)
'समझे क्या' हे गाणं 'अकापेला' स्वरूपात आहे. 'अकापेला' हा गाण्याचा प्रकार आहे ज्यामध्ये कोणत्याही संगीत उपकरणांचा वापर केला जात नाही. म्हणजेच कोणत्याही इंस्ट्रुमेंट्सचा उपयोग न करता तोंडाच्या माध्यमातून गायलेलं गाणं म्हणजे अकापेला गाणं. गाण्याच्या शब्दांसह गाण्याला लागणारे म्युझिक हे तोंडानेच दिले जाते, असे या सिनेमातील ‘समझे क्या?’ हे अकापेला डुएट गाणं सोनू निगम आणि शनमुखप्रिया यांनी गायले आहे. अकापेला गाण्याला सोनू-शनमुख यांचा आवाज आणि स्वयम आणि अमरजाची आशिकी या भन्नाट कॉम्बिनेशनची नशा आता प्रेक्षकांच्या मनावर होणार कारण हे हटके गाणं आता सोशल मिडीयावर रिलीझ करण्यात आलं आहे.
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित या सिनेमात रोमांटिक लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. सिनेमात अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे ही नवी जोडी झळकणार आहे. हा सिनेमा 1 मार्च 2019 दिवशी रीलीज होणार आहे.