Ashi Hi Ashiqui Song: 'अशी ही आशिकी' गाण्यात अभिनय बर्डे-हेमल इंगळे यांचा रोमांटिक अंदाज!
Ashi Hi Ashiqui Song (Photo Credit : Youtube)

Ashi Hi Ashiqui Song:  'ती सध्या काय करते' (Ti Sadhya Kay Karte) या सिनेमातून सिनेसृष्टीत पर्दापण करणारा अभिनय बर्डे (Abhinay Berde) याता 'अशी ही आशिकी' (Ashi Hi Ashiqui) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टीझरनंतर या सिनेमातील पहिले गाणे 'अशी ही आशिकी' आऊट झाले आहे. हे गाणे सोनू निगम (Sonu Nigam) आणि प्रियंका बर्वे (Priyanka Barve) यांनी गायले आहे. अभिनय बेर्डे याच्या 'आशिकी'चा पत्ता अखेर लागलाच

तुम्हीही पाहा हे गाणे:

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित या सिनेमात  रोमांटिक लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. सिनेमात अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे ही नवी जोडी झळकणार आहे.  हा सिनेमा 1 मार्च 2019 दिवशी रीलीज होणार आहे.