Thackeray Movie: 'ठाकरे' चित्रपट प्रदर्शित करण्यास संभाजी ब्रिगेड यांच्याकडून 'या' कारणामुळे विरोध
Thackeray Movie (Photo Credits: Twitter)

Thackeray Movie: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (BalThackeray) यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटावरुन संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) यांनी प्रदर्शिकरणाला विरोध दर्शवला आहे. तसेच नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui)  ह्याने साकारलेल्या बाळासाहेबांच्या भुमिकेतील एका दृश्यावरुन हा विरोध दर्शवण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला नवाजुद्दीनने पायात चपला घालून हार घातला आहे असे त्यांनी म्हटले आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राची शान असून चित्रपटातील हे दृश्य त्यांच्या अपमानास्पद आहे.( हेही वाचा-

'ठाकरे' सिनेमामधून सचिन खेडेकरचा आवाज गायब, तुम्ही ऐकली का 'Thackeray' ची नवी झलक)

यामुळे चित्रपटातील नवाजुद्दीनने संभाजी महाराजांच्या प्रतिमेवरील दृश्य काढून टाका असे सांगितले आहे. कारण पायात चप्पल घालून हार घालणे म्हणजे छत्रपची संभाजी महाराज यांचा अपमान केल्यासारखे आहे. त्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी हे दृश्य काढून न टाकल्यास सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.