मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर लवकरच 'मीडियम Spicy'ह्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतकंच नव्हे तर ह्या चित्रपटात प्रथमच आपल्याला सई आणि अभिनेता ललित प्रभाकर ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोशल मिडियावर नेहमी अॅक्विव असणा-या सईने नुकतच आपल्या इन्स्टाग्रामवर ह्या चित्रपटाच्या टीमसोबतचा फोटो शेअर केला.
ह्या फोटोसोबत सईने 'मीडियम Spicy', दोन टोकांचा मध्य साधणारी गोष्ट! असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे ह्या चित्रपटाची कथा दोन व्यक्तिमधली, दोन पिढींमधली किंवा अन्य काही असेल, ह्याबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढलीय. ह्या चित्रपटात सईसोबत अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री पर्ण पेठे सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
मीडियम Spicy सिनेमाच्या टीमचा फोटो
विधि कासलीवाल निर्मित 'मीडियम Spicy'च्या माध्यमातून प्रसिद्ध नाटककार मोहित टाकळकर मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. विधि कासलीवाल यांच्या लँडमार्क फिल्म्सने याआधीही अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.
Sachin Kundalkar यांनी सोशल मीडियातून शेअर केला Pondicherry टीमचा पहिला फोटो !
या चित्रपटाव्यतिरिक्त 'सई पाँडेचेरी' या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.