लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात, असं म्हणतात हे काही चुकीचे नाही. या लग्नबंधनात अडकलेली अशीच एक गोड जोडी म्हणजे सचिन आणि सुप्रिया पिळगावकर (Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar) यांची आणि काय योगायोग आहे बघा! वयामध्ये 10 वर्षाचे अंतर असतानाही या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. सचिन पिळगावकर यांचा जन्म 17 ऑगस्ट 1957 मध्ये झाला तर सुप्रिया पिळगावकर यांचा जन्म 1967 मध्ये झाला. या दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली ती 'नवरी मिळे नव-याला' (Navri mile Navryala) या चित्रपटातून आणि त्यांची लग्नगाठ बांधण्यात मुख्य दुवा ठरल्या त्या सचिन यांच्या आई!
सुप्रिया अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असतानाच त्या किलबिल या दूरदर्शन वरील मालिकेमध्ये ही काम करत होत्या. सचिन पिळगावकर यांच्या आईने सुप्रियांना पाहिलं आणि पाहता क्षणी त्यांना त्या खूप आवडल्या आणि कालांतराने सचिन पिळगावकर हे त्यांच्या 'नवरी मिळे नवऱ्याला' या चित्रपटासाठी एका अभिनेत्रीच्या शोधात होते, असं म्हटलं जातं की लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात म्हणूनच या दोन व्यक्ती एकच क्षेत्रामध्ये एकाच पद्धतीचे काम करत होती सचिन पिळगावकर यांच्या आईने त्यांना असं सुचवलं की तुझ्या नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटासाठी मी एक सुंदर मुलगी हेरून ठेवली आहे आणि लग्नासाठीही तिचा विचार करतोस का हे बघ आणि त्या होत्या सुप्रिया आणि आईने सांगितल्याप्रमाणे सचिन पिळगावकर यांनीही ही गोष्ट मनावर घेतली.
हेदेखील वाचा- सचिन पिळगावकर यांच्या नोकराचा प्रताप, भंगारात विकली महागुरुंची सन्मानचिन्हे
त्यानंतर सचिन पिळगावकर यांनी सुप्रियाची भेट घेतली आणि आपल्या चित्रपटासाठी विचारले. त्यानंतर सुप्रियाने घरच्यांना विचारून चित्रपटास होकार दिला. शूटिंगदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि हा चित्रपट हिट झाल्यानंतर प्रेक्षकही या जोडीला पसंत करु लागले. शेवटी सचिन पिळगावकर यांनी धाडस करून सुप्रियांना लग्नासाठी मागणी घातली आणि त्या खूप आश्चर्यचकित झाल्या. कारण त्यांना असं वाटत होतं की सचिन पिळगावकर हे विवाहित आहेत. परंतु सचिन पिळगावकर यांनी सांगितलं की नाही माझं अजून लग्न झालेलं नाही मी सिंगल आहे. परंतु येथेदेखील त्यांनी लगेच होकार दिला नाही त्यांनी थोडा वेळ घेतला विचार केला आणि नंतरच लग्नाला होकार दिला आणि शेवटी नवरी मिळाली नवऱ्याला याप्रमाणे 21 डिसेंबर 1985 ला त्यांचं लग्न झालं.
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची जोडी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि सुपरहिट जोडी बनली आहे. या गोड जोडीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!