Saavat Movie Official 3rd Teaser: भीतीचे 'सावट' अजून गडद होत जाणार, चित्रपटाचा नवा टिझर प्रदर्शित
Saavat Movie Official 3rd Teaser (Photo Credits-You Tube0

Saavat Movie Official 3rd Teaser: भारतात अजूनही काही ठिकाणी अंधश्रद्धेवर लोकांचा विश्वास आहे. तसेच लोकांमध्ये जादू टोणा हा देखील प्रकार गावाकडच्या भागात पाहायला मिळतो. अशा कथांवर आधारित आपण बरेशचे चित्रपट पाहतो. त्यामधून आपल्याला अशा गोष्टीमागचे रहस्य उलगडण्यास मदत होते. अशाच एका कथेवर आधारित असलेला आगामी मराठी चित्रपट 'सावट' (Saavat) येत्या 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सौरभ सिंहा (Saurabh Sinha)  या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपाटातील बॅकग्राऊंड स्कोअरमुळे भीतीचे सावट अजून गडद झालेले दिसून येणार आहे. सावट चित्रपटाची कथा ही 7 वर्षांमध्ये श्रावण महिन्यात 7 आत्महत्या झाल्याचे पाहायला मिळणार आहे. परंतु आत्महत्येचे कारण अद्याप गुपित असल्याचे अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली लोक होम हवन,पूजा-पाट करुन ही भीतीचे सावट घालवण्यास अयशस्वी होताना दिसून येतात. एक सस्पेंस थ्रिलर अशा कथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.(हेही वाचा-Saavat Official Teaser: सात श्रावणातील सात खून आणि गडद होत जाणारे भीतीचे 'सावट', 22 मार्चला उलगडणार रहस्य)

या चित्रपटात कलाकार स्मिता तांबे, मिलिंद शिरोळे, श्वेतांबरी घुटे आणि संजीवनी जाधव हे मुख्य भुमिकेतून झळकणार आहेत. तसेच हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.