प्रथमेश परब होणार आहे ‘टल्ली’; कसा? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर
Prathamesh Parab (Photo Credits: Facebook)

टाईमपास या मराठी चित्रपटातून घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे प्रथमेश परब. त्याचा नैसर्गिक अभिनय कौशल्यामुळे प्रथमेशला आजवर अनेक मराठी चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. नुकतेच त्याने आपल्या आगामी चित्रपटाचे टाइटल पोस्टर सोशल मीडियावरून शेअर केले आहे.

२०२० साली प्रदर्शित होणाऱ्या ‘टल्ली’ या सिनेमात प्रथमेश मुख्य भुमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या टायटलमुळेच सध्या या सिनेमा विषयीची प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे.

झेब्रा एंटरटेन्मेंट या प्रोडक्शन हाऊसचे निर्माते संजय गोळपकर चित्रपटाविषयी सांगताना म्हणाले, “आमच्या प्रोडक्शन हाऊसची टल्ली ही पहिलीच फिल्म आहे. आणि नावाप्रमाणेच हा सिनेमा धमाल विनोदी चित्रपट असणार आहे. या चित्रपटात प्रथमेश परबचे नाव 'टल्ली' आहे. आता ज्याचे नावच 'टल्ली' असेल, अशा हिरोवर जेव्हा सिनेमा बनेल, तर तो किती विनोदी असेल, याची तुम्हीच कल्पना करू शकता.”

Tumbbad च्या प्रीक्वल किंवा सिक्वल बाबत विचार सुरु; पाहा काय म्हणाला चित्रपटाचा निर्माता

या नव्या प्रोजेक्टबद्दल प्रथमेश म्हणतो, “माझ्या आजवरच्या विनोदी भूमिकांना आणि चित्रपटांना महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. टल्ली सिनेमा जरी विनोदी असला, तरीही या सिनेमात विनोदाला समाज प्रबोधनाची झालर आहे. या सिनेमात पहिल्यांदाच माझी ओळख करून देताना नावाअगोदर ‘in & as’ प्रथमेश परब असे दिसेल. कोणत्याही अभिनेत्याच्या कारकिर्दीत अशी ओळख होणे, ही मानाची गोष्ट असते. तसेच या सिनेमात माझा लूकही वेगळा असणार आहे. आणि या रोलसाठी माझं फिजीकल ट्रेनिंगही लवकरच सुरू होईल.”