दिग्दर्शन, अभिनय, लेखन अशा कलेशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये मुशाफीरी करणाऱ्या स्वप्निल मयेकर यांचे निधन (Swapnil Mayekar Passes Away) झाले आहे. ते अवघ्या 46 वर्षांचे होते. धक्कादायक असे की, त्यांनी 'मराठी पाऊल पडते पुढे' (Marathi Pavool Padate Pudhe) या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. जो उद्या म्हणजेच पाच मे रोजी प्रदर्शित होतो आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शनाच्या एक दिवस आगोदर स्वप्नील मयेकर (Swapnil Mayekar) यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठी चित्रपट आणि कलाविश्वाला धक्का बसला आहे.
स्वप्नील मयेकर यांचे आकस्मिक जाणे अनेक अर्थांनी अनेकांसाठी धक्कादायक आहे. स्वप्नील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. त्यांनी 'हा खेळ संचितांचा' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जबाबदारी निभावली होती. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत मोजकेच काम केले होते. पण त्या कामाचे अनेकांनी कौतुक केले होते. (हेही वाचा, Jiah Khan Suicide Case: अभिनेता सूरज पांचोली याची जिया खान आत्महत्या प्रकरणात निर्दोश मुक्तता)
'मराठी पाऊल पडते पुढे' हा स्वप्नील मयेकर यांचा पहिलाच चित्रपट होता. जो त्यांनी स्वत: दिग्दर्शित केला होता. हा चित्रपच येत्या पाच मे म्हणजेच उद्या प्रदर्शित होणार होता. दरम्यानच, मयेकर यांचे निधन झाले. पाठिमागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाचे प्रमोशनही सुरु होते. त्यांच्या जान्याने चित्रपटाची टीम आणि त्यांचे आप्तेष्ट सुन्न झाले आहेत.