शारदीय नवरात्र (Navratri) म्हणजे आदिशक्तीचा जागर करण्याचा, स्त्री शक्तीला सलाम करण्याचा सण! नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवामध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit) दरवर्षी एका थीम वर तिच्या कलकृतीमधी दुर्गेच्या नऊ स्वरूपांना वंदन करते. यंदा नवरात्रीवर कोरोनाचं सावट आहे. अवघं जग मागील 7 महिन्यांपासून कोरोना व्हायरसरूपी असूराशी लढत आहे. पण या जागतिक आरोग्य संकटामध्येही समाजातील काही घटक कोविड योद्धे म्हणून उभे आहेत. त्यामुळे या कोविड योद्धांना सलाम करण्यासाठी तेजस्विनीने यंदाच्या नवरात्रीची विशेष निवड केली आहे. आज (20 ऑक्टोबर) शारदीय नवरात्र 2020 मधील चौथा दिवस आहे. आजच्या दिवशी शेतात राबणार्या शेतकरी महिलेच्या मनाची अवस्था तेजस्विनीने मांडली आहे. आपल्या बाळासाठी जीव तुटणार्या एका शेतकरी महिलेचं रूप धारण करून तिने आपले आभार व्यक्त केले आहेत. Navratri 2020: नागरिकांना स्वच्छ श्वास देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या महिलेच्या रुपातील देवीच्या 'या' अवताराचे तेजस्विनी पंडित ने घडवले दर्शन, See Pic.
'शिवारात या माह्या
कदी आभाय फुटलं, कदी धरिनी रुसली
पन माय हे तुयी हर दैवाशी भांडली
दम धर रे लेकरा हात चालवू दे मले भरभर
तेथं लेकरं हजार वाट पाह्यते मंडईवर...' अशा कॅप्शनसह पाठीवर बाळ बांधून शेतामध्ये राबणार्या महिलेचं रूप तेजस्वीनीने साकारलं आहे.
तेजस्विनी पंडीत पोस्ट
आधीच कोरोनाचं संकट त्यानंतर अवकाळी पाऊस यामुळे महाराष्ट्रातील शेतकर्यावर यंदा दुहेरी संकटाचा वार झाला आहे. मार्च महिन्यात जसा कोरोना फोफावायला लागला तसा लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे वाहतूक सेवा ठप्प झाली, व्यवहार थांबले. मात्र जगाचा पोशिंदा या कठीण काळामध्येही उभा राहिला. जीव धोक्यात घालून शेतकर्यांनी माल नागरिकांना उपलब्ध करून दिला. अन्नधान्याची चणचण भासू नये म्हणून शेतकरी न खचता उभा राहिला.