'बाबो' सोबत भन्नाट 'नाचकाम' करायला व्हा तयार, बाबो चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित
Babo Marathi movie (Photo Credit: File)

एका 'इरसाल गावाची धम्माल मस्ती' हास्यमय रुपात प्रेक्षकांसमोर घेऊन येणारा मल्हार फिल्म क्रिएशन्सचा 'बाबो' हा चित्रपट येत्या 31 मे ला प्रदर्शित होत आहे. ह्या चित्रपटाची त्याच्या नावावरुन तसेच त्याच्या ट्रेलर वरुन बरीच चर्चा रंगतेय. ह्या चर्चेला अजून भर पाडायला आलय हा चित्रपटाचे इरसाल, धमाकेदार गाणे. 'नाचकाम' असे ह्या गाण्याचे नाव असून गायक नागेश मोर्वेकर ह्यांच्या आवाजात हे धमाकेदार गाणं आपल्याला ऐकायला मिळेल. नागेश मोर्वेकर यांनी ह्याआधी 'आवाज वाढव डीजे' तुला हे भन्नाट गाणं तसेच 'गावा गाता गजाली' या झी मराठीवरील मालिकेचे शीर्षकगीत गायले आहे.

बाबो चित्रपटातील 'नाचकाम' गाणे:

या गावाच्या अनेक समस्या आहेतच, पण त्याही पेक्षा मोठी समस्या एका नवविवाहित दाम्पत्याला आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे, मात्र त्यांचा जागरण गोंधळ झालेला नाही आणि दुसरीकडे गावात अवकाशातील यान कोसळणार असल्याची बातमी टीव्हीवर ऐकायला मिळते. त्यानंतर ह्या गावात गोंधळ उडतो, अशी काहीशी ह्या चित्रपटाची कथा आहे. ह्या चित्रपटातून अमोल कागणे आणि प्रतिक्षा मुणगेकर ही जोडी प्रथमच आपल्यासमोर येत आहे. 'नाचकाम' ह्या गाण्यामध्ये अभिनेता अमोल कागणे हा नवरदेव दाखवला असून त्याची घोड्यावरून वरात काढली आहे असं दाखवले आहे. हे गाणे मंगेश कागणे यांनी लिहिले असून रोहित नागभिडे ह्या गाण्याचे संगीतकार आहेत.

Nagin Dance Song: आदर्श शिंदे च्या आवाजात 'कागर' सिनेमातील नवं दमदार गाणं 'नागीण डान्स' 

रमेश चौधरी दिग्दर्शित 'बाबो' ह्या चित्रपटाची निर्मिती सचिन बाबुराव पवार यांनी केली आहे. तर अरविंद जगताप यांनी ह्या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटात अभिनेते सयाजी शिंदे, संवेदनशील कवी अभिनेते किशोर कदम यांच्यासह भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, निशा परुळेकर, विजय निकम, जयवंत वाडकर, रमेश चौधरी, विनोद शिंदे आदी कलाकार या चित्रपटात आहेत. 'बाबो' ह्या चित्रपटातील हे गाणे नक्कीच लोकप्रिय होईल आणि वराती, हळदीमध्ये नक्कीच वाजवले जाईल, असे एकूणच ह्या गाण्याच्या बोलावरून दिसतय.