नाळ सिनेमातील 'जाऊ द्या ना व' या धमाल गाण्याचा मेकिंग व्हिडिओ व्हायरल
नाळ सिनेमातील गाणे (Photo Credit : Youtube)

नागराज मंजुळे निर्मित 'नाळ' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवासांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. चैतन्यच्या भावविश्वाभोवती फिरणारा हा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला.  मस्तीखोर स्वभाव आणि आई-मुलाचे नाते यावर भाष्य करणाऱ्या या सिनेमाचे गाणे देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ समोर येत आहे. हा मेकिंग व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.

'जावू दे ना वं' असे या गाण्याचे बोल असून जयस कुमार या बाल गायकाने हे गाणे गायले आहे. तर ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी हे गाणे लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे.

तुम्हीही पाहा हे धमाल गाण्याचा मेकिंग व्हिडिओ...

नाळ सिनेमा झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे यांची निर्मिती आहे. सिनेमा निर्मितीचा नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तर सैराट सिनेमाचे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 16 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.