Mumbai Pune Mumbai 3 Song : 'कुणी येणार गं' हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (Video)
स्वप्निल जोशी-मुक्ता बर्वे I मुंबई पुणे मुंबई 3 I (Photo Credit : Twitter)

2010 मध्ये आलेल्या स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या 'मुंबई पुणे मुंबई' सिनेमाने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली. सिनेमातील गौरी-गौतम यांचा मुंबई-पुणे वाद, साधे पण तितक्या हटक्या संवादांनी प्रेक्षकांना आपलसं केलं. त्यानंतर गौरी-गौतमच्या प्रेम ते लग्न हा प्रवास 'मुंबई पुणे मुंबई 2' या सिनेमातून दाखवण्यात आला. आता लग्नानंतरची गोष्ट सांगण्यासाठी या सिनेमाचा तिसरा भाग 'मुंबई पुणे मुंबई 3' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या सिनेमातील एक गाणं प्रदर्शित झालं. टीझरमधून गौरी-गौतमच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावरच आधारीत 'कुणी येणार गं' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पाहा : मुंबई पुणे मुंबई 3 चा टीझर

'गोड बातमी देणारं, कुणी येणार गं,' असं म्हणतं स्वप्निल जोशीने हे गाणं ट्विटरवर शेअर केलं आहे. सुखी संसाराला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर नवा पाहुणा या कुटुंबात येणार आहे. त्याच्या स्वागताची तयारी, गौरीचं डोहाळे जेवण याची झलक या गाण्यात पाहायला मिळते.

गौरी-गौतमच्या प्रेमाचे नवे वळण 'मुंबई पुणे मुंबई 3' या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित हा सिनेमा 7 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.