Mumbai Pune Mumbai 3 Teaser : गौतम आणि गौरीचं नातं पुन्हा नव्या वळणावर
मुंबई पुणे मुंबई 3 टीझर Photo Credits You Tube

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाची जादू आजही रसिकांच्या मनावर कायम आहे. लग्नसंस्थेवर आधारित या चित्रपटाची पारायणं करणारे अनेक मराठी सिनेमे चाहते आहेत. या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीला स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे ही सुपर डूपर हीट जोडी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटाची उत्सुकता होती. अखेर आज ही प्रतिक्षा पूर्ण झाली आहे.

मुंबई पुणे मुंबई 3

 

मुंबई पुणे मुंबई या पहिल्या भागात स्वप्नील आणि मुक्ता अरेंज्ड मॅरेज पद्धतीने लग्नाआधी भेटतात. या चित्रपटाच्या दुसर्‍या सिक्वेलमध्ये नातं एका विचित्र वळणावर येतं आणि ते कसे लग्नबंधनात अडकतात हे पाहणं उत्सुकतेचं होतं. आता मुंबई पुणे मुंबई 3 या भागात त्यांच्या आयुष्यात काय होणार ? ही कमालीची उत्सुकता पूर्ण होणार आहे. टीझरमध्ये ही जोडी आता लवकरच आई बाबा होणार असल्याची चाहूल रसिकांना मिळाली आहे.

उलगडणार नवा प्रवास

स्वप्नील आणि मुक्ता बर्वे हे मुंबई पुण्याचे तरूण आहेत. त्यांचा तीन वर्षांचा संसार या चित्रपटात पुन्हा एका वळणावर आला आहे. आता नेमकं त्यांच्या आयुष्यात काय होणार यासाठी रसिकांना 7 डिसेंबर पर्यंत थांबावं लागणार आहे. मुंबई पुणे मुंबई हा सतिश राजवाडे दिग्दर्शित सिनेमा 7 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.