(Photo Credit - Twitter, Insta)

दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित पावनखिंड (Pawankhind) चित्रपटाचे सगळीकडून कौतुक होत आहे. तसेच या चित्रपटाची बाक्स ऑफिसवरही चांगलीच घौडदौड सुरु आहे. महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रक्षेकांची या चित्रपटाने मन जिंकली आहे. पावनखिंड आणि त्याचा इतिहास साकरताना अनेक दिग्जांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. शिवजंयतीच्या मुहर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची वाटचाल अजुनही सुरुच आहे. पावनखिंडच्या टीमने नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची भेट घेतली, आणि त्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले. पावनखिंड या चित्रपटाच कौतुक करताना मोहन भागवत म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सगळ्या पिढ्यांना स्वाभिमान आणि संजीवनी देणारा आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास सर्वांसमोर आला पाहिजे. हा चित्रपट अत्यंत सरस पद्धतीनं तयार करण्यात आला आहे.'

पावनखिंड चित्रपटाच्या इन्स्टाग्रामवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, 'अचानक मिळालेला छान आशीर्वाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांची भेट घेण्याची संधी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि टीमला मिळाली तेव्हा त्यांना वीरांगना टिझर, मुख्य ट्रेलर, युगत मांडली गाणे आणि climax मधील काही भाग दाखवला. सुरुवातीला दिलेली  20  मिनिटांची वेळ बघता बघता 1 तासाची चर्चात्मक भेट झाली. त्यांनी लवकरच संपूर्ण चित्रपट पाहण्याची इच्छा दर्शविली आहे. दिलेल्या या वेळेसाठी पावनखिंडची संपूर्ण टीम तुमची खूप खूप आभारी आहे. (हे ही वाचा Pawankhind: रितेश देशमुखनं पावनखिंड चित्रपटाचं केले कौतुक, प्रेक्षकांचे मानले आभार)

ऐकुण बॉक्स ऑफिसवर 16.71 कोटींचा गल्ला जमवला  

सिनेमाने पहिल्या आठवड्यात 12.17 कोटींची कमाई केली आहे. तर विकेंडला शुक्रवारी 1.02 कोटी, शनिवारी 1.55 कोटी आणि शनिवारी 1.97 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 16.71 कोटींचा गल्ला जमवला आहे.