'स्वप्निल जोशी' चा आगामी सिनेमा 'मोगरा फुलला' 14 जूनला होणार रीलिज
Mogra Phulaalaa (Photo Credits: Instagram)

मराठी सिनेमातील सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi)  लवकरच 'मोगरा फुलला' या आगामी मराठी सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये स्वप्नीलची मुख्य भूमिका आहे. एका सर्वसामान्य तरूणाची भूमिका साकारणार्‍या स्वप्नीलचा पहिला लूक काही दिवसांपूर्वी रीलीज करण्यात आला आहे. या सिनेमाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा सुरू असताना आता या सिनेमाची रीलिज डेट आणि इतर कलाकारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. मोगरा फुलला (Mogra Phulaalaa) हा आगामी मराठी सिनेमा 14 जून दिवशी रीलिज होणार आहे. ‘मोगरा फुलला’ सिनेमातील Swwapnil Joshi च्या लुकची पहिली झलक

मोगरा फुलला या सिनेमाचं दिग्दर्शन श्रावणी देवधर यांचं असून ‘जीसिम्स’यांची निर्मिती आहे. या चित्रपटात साई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख कलाकार खास भूमिकेत दिसणार आहेत.