Miss You Mister Movie Poster: सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे चा ‘मिस यू मिस्टर' २१ जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला, टीमने केलं सिनेमाचं पोस्टर रिलीज
Miss You Mister Movie Poster (Photo Credits: File Photo)

मराठी सिनेमा (Marathi Cinema) सोबतच सध्या वेबविश्वात देखील चर्चेत असलेला सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar)  आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrinmayee Deshpande) आपला नवा कोरा चित्रपट 'मिस यु मिस्टर' (Miss You Mister) सोबत प्रेक्षकांची भेट घेण्यास सज्ज झाले आहेत. 21 जून (21st June) रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित केल्या जाणाऱ्या या चित्रपटात सिद्धार्थ आणि मृण्मयी प्रमुख भूमिका साकारत आहेत. या सिनेमाचे पोस्टर (Movie Poster) नुकतेच फिल्मच्या टीमकडून प्रदर्शित करण्यात आले. कामानिमित्त एकेमकांपासून दूर राहणाऱ्या  जोडप्याची  ही मॉडर्न डे प्रेमकथा  मंत्रा व्हिजन (Mantra Vision) या युवा कंपनीने थ्री आय क्रिएटिव्ह (Three Eye Creative Films)फिल्म्सच्या सोबतीने प्रस्तुत  केली आहे.

मिस यू मिस्टर’ हा कौटुंबिक सिनेमा कावेरी व वरुण या जोडप्याच्या माध्यमातून एकमेकांवर अतीव प्रेम असूनही कामामुळे एकमेकांना वेळ न देऊ शकणाऱ्या प्रत्येक नात्याला समर्पित केलेला आहे. वेळेच्या अभावी कोणत्याही नात्यात येणार शारीरिक अंतर कालांतराने नात्याच्या मुळाशीच घाव घालतं, यामुळे गोंधळून गेलेल्या जोडप्यानां हसतखेळत उपाय सुचविण्याचे काम हा सिनेमा करेल असा विश्वास दिग्दर्शक समीर जोशी यांनी व्यक्त केला आहे. या सिनेमात वरुण आणि कावेरीची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ आणि मृण्मयी सोबत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर,राधिका विद्यासागर हे कलाकार दिसणार आहेत.

सिनेमा विषयी बोलताना मृण्मयी सांगते की, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. चित्रपटाच्या नावातच या कथेचा सारांश मांडला आहे. यापूर्वी मृण्मयी आणि सिद्धार्थने एकांकिका व नाटकांमध्ये एकत्र काम केले होते आता मोठया पडद्यावर ही जोडी काय धमाल करतेय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन

दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे निर्मित, समीर जोशींच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘मिस यू मिस्टर’ हा सिनेमा हसत-खेळत, डोळ्यांच्या कडा ओल्या करून जाईल असं चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात येतंय.