Mauli Review : शरद केळकर,अमृता खानविलकर,आदिनाथ कोठारे सह 'माऊली' सिनेमावर मराठी कलाकारांच्या ट्विटरवर प्रतिक्रिया
Mauli ( Photo Credits: File Photo)

Mauli Review by Marathi Celebrities :  लय भारी (Lai Bhari)  सिनेमानंतर चार वर्षाहून अधिक काळाने पुन्हा मराठी सिनेमाकडे रितेश देशमुख (Riteish Deshmukh)  वळला आहे. 14 डिसेंबरपासून रितेश देशमुखचा 'माऊली' (Mauli) हा अ‍ॅक्शनपॅक्ट सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. लय भारी सिनेमाचा हा सिक्वेल नसून केवळ त्याच अंदाजातील हा नवा सिनेमा आहे. त्यामुळे पुन्हा मराठी सिनेमामध्ये रितेशचा स्वॅग, गावरान अंदाज, रोमॅन्टिक हिरो आणि दमदार अ‍ॅक्शनची वाट पाहणार्‍या त्याच्या फॅन्ससाठींची मोठी प्रतिक्षा संपणार आहे. रितेश देशमुखचा 'माऊली' अवतार WhatsApp Sticker Pack, GIF च्या माध्यमातूनही रसिकांच्या भेटीला ! कसे डाऊनलोड कराल हे स्टिकर्स ?

मराठी कलाकारांसोबतच सलमान खान, शाहरुख खान यांच्यासारखे बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी रितेशला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काही मराठी कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून सिनेमाचा रिव्ह्यु देत रसिकांना हा सिनेमा थिएटर्समध्ये जाऊनच पाहण्याचा सल्ला दिला आहे. MAULI Trailer : माऊली सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रसिकांच्या भेटीला, Salman Khan ने केला ट्विट

मराठी कलाकारांचा रिव्ह्यू -

माऊली सिनेमाची स्टारकास्ट -

माऊली सिनेमात अभिनेता रितेश देशमुख पोलिस इन्सपेक्टर माऊली सर्जेराव देशमुख तर जितेंद्र जोशी 'नाना लोंढे' या खलनायिकाचया भूमिकेत, सैय्यामी खेर या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. रेणुका असं तिच्या भूमिकेचं नाव आहे.  अजय अतुलची गाणी आणि रितेश देशमुखचा मराठी सिनेमातून कमर्शिअल सिनेमा मांडण्याचा अंदाज नक्कीच प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्ये खेचून आणायला मदत करेल.