मराठी भाषेतील ‘द डिसायपल’ (The Disciple) या चित्रपटाची निवड व्हेनिस चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे. 'व्हेनिस चित्रपट महोत्सव' (Venice International Film Festival) हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांपैकी एक महत्त्वाचा महोत्सव म्हणून ओळखला जातो. मराठी चित्रपटसृष्टीत अपवाद वगळता नेहमीच आशयघन चित्रपनिर्मिती झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 1932 पासून भरवला जातो. त्यामुळे गेल्या अनेक दशकांची परंपरा या महोत्सवाला लाभली आहे. या महोत्सवाचे यंदा 77 वे वर्ष आहे.
‘द डिसायपल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन चैतन्य ताम्हाणे (Chaitanya Tamhane) यांनी केले आहे. स्पर्धा विभागातून ‘द डिसायपल’ चित्रपटाची निवड करण्यात आली. चैतन्नय ताम्हाणे या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या 'कोर्ट' चित्रपटालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
उल्लेखनिय म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीला व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तब्बल 20 वर्षांनंतर संधी मिळाली आहे. मराठी माणूस, मराठी भाषा आणि महाराष्ट्रासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानाची बाब समजली जात आहे. मराठी चित्रपट ‘द डिसायपल’ ला व्हेनिस महोत्सवात संधी मिळाल्याबाबत दिग्दर्शक रवी जाधव यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. दरम्यान, या आधी 1937 मध्ये ‘संत तुकाराम’ या चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून या महोत्सवात सन्मानित करण्यात आले आहे. (हेही वाचा, Bharatiya Digital Party: 'भाडिपा' सांगणार विधानसभा निवडणुकीची गोष्ट, लवकरच वेबसिरीजच्या माध्यमातून डिजिटल पडद्यावर)
तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका ‘भारतीय’ चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट हि आहे की हा चित्रपट ‘मराठी’ आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’! त्रिवार अभिनंदन चैतन्यआणि टिम 👍🙏♥️
— Ravi Jadhav (@meranamravi) July 30, 2020
रवी जाधव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका ‘भारतीय’ चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट ही आहे की हा चित्रपट ‘मराठी’ आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’! त्रिवार अभिनंदन चैतन्यआणि टीम”