Bharatiya Digital Party: 'भाडिपा' सांगणार विधानसभा निवडणुकीची गोष्ट, लवकरच वेबसिरीजच्या माध्यमातून डिजिटल पडद्यावर
Vidhan Sabha Election Story On BhaDiPa | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय डिजिटल पार्टी (Bharatiya Digital Party) म्हणजेच 'भाडिपा' (BhaDiPa) आता डिजिटल माध्यमात लवकरच घेऊन येत आहे 'विधानसभा निवडणुकीची गोष्ट'. होय, विधानसभा निवडणूक 2019 ची एक उत्कंठावर्धक वर्धक गोष्ट '36 डेज्' (36 Days ) या पुस्तकात अनेकांनी वाचली असेल. कमलेश सुतार (Kamlesh Sutar) नावाच्या लेखकाने ही गोष्ट लिहील होती. ही गोष्ट म्हणजे निवडणुकीतल राजकारण आणि मुख्यमंत्री पदासाठी राजकीय पक्षांनी केलेला खटाटोप होय. हा सर्व खटाटोप '36 डेज्' या पुस्तकात मांडण्यात आला आहे. या पुस्तकाचे रुपांतर डिजिटल पडद्यावर करण्यासाठी आवश्यक असणारे हक्क 'भाडिपा'ने मिळवले आहेत. त्यामुळे आता हा सर्व खटाटोप 'भाडिपा'वर लवरकच पहायला मिळणार आहे..

दरम्यान, 'गुलबदन टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड'चे उपसंस्थापक आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक सारंग साठ्ये यांनी इसकाळडॉटकॉमला दिलेल्या माहितीनुसार, ते स्वत: (सारंग साठ्ये) विधानसभा निवडणुकीच गोष्टबाबत उत्सुक होते. विधानसभा निवडणूक 2019 मध्य घडलेल्या घटना, घडामोडी यांबाबत त्यांना उत्सुकता होती. तसेच कमलेश सुतार यांनी लिहिलेल्या '36 डेज्' हे पुस्तकातील कथानक, पात्र ही दृकश्राव्य माध्यमासाठी अगदी पुरेपूर उपयोगी आहेत. त्यामुळे ही कथा जशी घडली तशीच सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे साठ्ये यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Din 2019: ‘जय महाराष्ट्र’ सागर देशमुख, अभय महाजन यांच्यासह मराठी कलाकारांचं ‘महाराष्ट्र दिनी’ खास Marathi Acapella Song)

वेबसिरीज आणि युट्युब विश्वातील 'भाडिपा' हे एक वलयांकीत नाव आहे. गेल्या काही काळात भाडिपाने अनेक चांगल्या वेबसिरीची निर्मिती केली आहे. नेटीझन्सकडून या वेबसिरीजचे कौतुकही करण्यात आले आहे. त्यामुळे 'भाडिपा' निर्मित 'विधानसभा निवडणुकीची गोष्ट' कशी असणार याबाबत उत्सुकता आहे.