Maharashtra Din 2019: ‘जय महाराष्ट्र’ सागर देशमुख, अभय महाजन यांच्यासह मराठी कलाकारांचं ‘महाराष्ट्र दिनी’  खास Marathi Acapella Song
Jai Maharashtra Acapella Song (Photo Credits: BhaDiPa Facebook Page)

 Jai Maharashtra Marathi Acapella Song: आज 59 वा महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्राला ऐतिहासिक, सामाजिक आणि  सांस्कृतिक वारसा लाभला आहे. यंदाच्या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून  मराठी  कलाकारांनी शाहीर  अमर  शेख  यांच्या ‘जय  महाराष्ट्र’(Jai Maharashtra) या  गाण्याला अ‍ॅकापेला स्वरूपात मांडले आहे. ‘भारतीय डिजिटल  पार्टी’ च्या युट्युब चॅनेलच्या  माध्यमातून हे  गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. यामध्ये  सागर देशमुख (Sagar Deshmukh),  अभय  महाजन (Abhay Mahajan), पर्ण  पेठे (Parn Pethe) या  कलाकारांसोबत निखिल राणे (Nikhil Rane) या 'सायलेंट व्हिसल' वाजवणार्‍या मराठमोळ्या कलाकाराचा सहभाग आहे. Maharashtra Day 2019: महाराष्ट्र दिनानिमित्त खास मराठमोठी गीते (Video)

जय महाराष्ट्र अ‍ॅकपेला सॉन्ग

Acapella   हा संगीताचा असा  एक प्रकार  आहे. जो एकट्याने  किंवा  समुहगीत गायनाद्वारा देखील सादर  केला जातो. मात्र याच वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही वाद्याशिवाय यामध्ये संगीत निर्माण केलं जातं. ‘जय  महाराष्ट्र’  गाण्यामध्ये अभिनेता सागर  देशमुख, अभय महाजन, आलोक  राजवाडे, पर्ण पेठे यांच्यासोबत मूळची कॅनडाची पॉला मॅगलनचादेखील समावेश आहे.

भाडिपा या  लोकप्रिय मराठी युट्युब चॅनल ने काही वर्षांपूर्वी मिथिला पालकर सोबत महाराष्ट्र दिनी ‘मंगलदेशा..’ हे मराठी  गीत लोकांसमोर आणलं होतं.