India Independence Day 2020: ग्लॅमरस मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्मिता गोंदकर, मानसी नाईक यांनी आपल्या खास अंदाजात चाहत्यांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा; See Photos
सोनाली ने तिरंग्याच्या रंगातील ड्रेस घालूनतर स्मिता ने पांढ-या रंगाची साडी नेसून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आज संपूर्ण देशभरात स्वांतत्र्य दिन साजरा केला जात आहे. कोरोना व्हायरसमुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करुन लोक घरात राहूनच आपापल्या परीने हा उत्सव साजरा करत आहे. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यांच्यासोबत मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), स्मिता गोंदकर Smita Gondkar), मानसी नाईक (Mansi Naik) यांनीही आपल्या खास अंदाजात सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सोनाली ने तिरंग्याच्या रंगातील ड्रेस घालूनतर स्मिता ने पांढ-या रंगाची साडी नेसून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मराठीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री मानसी नाईक हिनेही 'देस रंगीला' या गाण्यावर खास व्हिडिओ सादर केला. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.