Lockdown: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात अनेक कलाकार आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत आहेत. तसेच काही कलाकार वेगवेगळ्या रेसिपी बनवून त्या शेअर करत आहेत. अशातचं मराठ-मोळी अभिनेत्री आणि डान्सर कृतिका गायकवाडने (Krutika Gaikwad) लॉकडाऊन (Lockdown) काळात न्यूजपेपरपासून हटके ड्रेस (Newspaper Dress) बनवला आहे.
कृतिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून न्यूजपेपर पासून बनवलेला ड्रेस परिधान केलेले फोटोज शेअर केले आहेत. या ड्रेसमध्ये कृतिका अतिशय हॉट दिसत आहे. तिच्या या फोटोजना चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्ट्स केल्या आहेत. कृतिका सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती आपले फोटोशुट सोशल मीडियावर अपलोड करत असते. परंतु, सध्या लॉकडाउनमुळे फोटोशूट शक्य नसल्यामुळे कृतिकाने शक्कल लढवत न्यूजपेपरपासून हटके ड्रेस बनवला आहे. (हेही वाचा - मराठी अभिनेता सुबोध भावे ने शेअर केला 'वीर सावरकर' या पहिल्या चित्रपटातील सीन; म्हणाला 'एवढं' मिळालं होत मानधन)
कृतिकाचा हा हटके आणि बोल्ड लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कृतिकाच्या ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि स्कर्ट वरील फोटोजची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हे फोटो शेअर करताना कृतिकाने ‘क्वारंटाइनमधील प्रयोग’, असं कॅप्शन दिलं आहे. यापूर्वी कृतिकाने कमोडवर बसलेले बोल्ड फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले होते. लॉकडाउन असलेली कृतिका गेल्या काही दिवसांपासून ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.