मराठी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) ने आपल्या ट्विटर हँडलवरून 'वीर सावरकर' (Veer Savarkar) या त्याच्या पहिल्या चित्रपटातील सीनचा स्क्रीन शॉर्ट शेअर केला आहे. हा सीन करण्यासाठी त्याला 100 रुपये मानधन मिळाले होते. यासाठी त्याला एक दिवस काम करावं लागलं होतं, असंही सुबोधने या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
'वीर सावरकर' या चित्रपटाची निर्मिती सुधीर फडके यांनी केली होती. सुबोधने या पोस्टमध्ये मदनलाल धिंग्रा लॉर्ड कर्झनची हत्या करतो तो सीन शेअर केला आहे. यावेळी मदनलाल धिंग्रा दारातून आतमध्ये प्रवेश करताना दाराजवळ जो ब्रिटिश सैनिक थांबलाय तो मी असल्याचंही सुबोधने सांगितलं आहे. (हेही वाचा - एकटं कुणी नाहीये! मराठी कलाकार अमेय वाघ, सखी गोखले, रुचा आपटे, पर्ण पेठ, सुजय जाधव यांचे कोरोनावर रॅप साँग; पहा प्रेरणादायी व्हिडिओ)
माझा पहिला चित्रपट
सुधीर फडके यांची निर्मिती असलेला "वीर सावरकर"
मदनलाल धिंग्रा लॉर्ड कर्झन ची हत्या करतो तो सीन.
मदनलाल धिंग्रा दारातून आतमध्ये प्रवेश करताना ,दाराजवळ जो ब्रिटिश सैनिक थांबलाय तो मी.
पाहिलं मानधन १०० रुपये
कामाचे दिवस ---फक्त एक😁😁😁😂😂😂 pic.twitter.com/ozgwfBQPNd
— Subodh Bhave (@subodhbhave) May 12, 2020
विशेष म्हणजे सुबोधला या चित्रपटात ब्रिटिश सैनिकाची भूमिका करण्यासाठी 100 रुपये मानधन मिळालं होतं. यासाठी त्याला फक्त एक दिवस काम करावं लागलं होतं. सुधीर फडके आपल्या वडिलांबरोबर वीर सावरकरांच्या भेटीला गेले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्राने भारलेल्या सुधीर फडके यांनी सावरकरांवर एक चित्रपट तयार करण्याचे ठरवले. अशा प्रकारे वीर सावरकर चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.
दरम्यान, सुबोधने शेअर केलेल्या या पोस्टमधून त्याचा खडतर जीवनप्रवास लक्षात येतो. एका ब्रिटिश सैनिकाची भूमिका साकारण्यापासून ते प्रसिद्ध मराठी अभिनेता असा सुबोधचा प्रवास मनाला भारावून टाकणारा आहे. सुबोधने चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका या तीनही माध्यमांत कामे केली आहेत. त्यांनी चित्रपटात केलेली बालगंधर्व यांची भूमिका खूप गाजली होती.