Mansi Naik Wedding Photos| Instragram/its.majja

लग्नसराईचा काळ असल्याने अनेक ठिकाणी चांगला मुहूर्त पाहून लग्नाचे विधी पार पाडले जात आहेत. सध्या भारतातील कोरोना संकटही आटोक्यात आल्याने अनेकांनी लगीन घाई सुरू केली आहे. याला मराठी कलाकार देखील अपवाद नाहीत. नववर्ष 2021 ची सुरूवात होताच अभिज्ञा भावे पाठोपाठ आता अभिनेत्री मानसी नाईक देखील विवाहबंधनात अडकली आहे. मानसी नाईकचा विवाह बॉक्सर, मॉडेल प्रदीप खरेरा खाच्यासोबत आज (19 जानेवारी) पुण्यामध्ये पार पडला आहे. दोघेही अनेक वर्ष रिलेशनशीप मध्ये होते. आता अखेर त्यांनी लग्नाची गाठ बांधली आहे. Manasi Naik Grahmag Puja Vidhi: मानसी नाईकच्या घरी लग्नविधींना सुरूवात, अभिनेत्रीचा झाला ग्रहमखचा कार्यक्रम, See pics

मानसी नाईक ही 'वाट बघतोय रिक्षावाला' आणि 'बाई वाड्यावर या' या दोन तुफान गाजलेल्या गाण्यांमधून घराघरात पोहचली आहे. नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता. सोशल मीडियामध्ये तिने या सोहळ्याचे फोटो शेअर करत रसिकांना सुखद धक्का दिला होता. आज मानसीच्या विवाहाला मराठी सिनेसृष्टीतून अभिनेत्री दीपाली सय्यद, रेशम टिपणीस यांनी हजेरी लावली होती.

मानसी नाईक विवाह सोहळा

 

View this post on Instagram

 

A post shared by Majja (@its.majja)

 

View this post on Instagram

 

A post shared by Majja (@its.majja)

मानसी नाईक ही गुलाबी रंगाच्या लेहग्यांमध्ये मोहक दिसत होती.मानसीच्या लग्नाला दीपाली सय्यदचा मात्र अस्सल पेशवाई मराठमोळा अंदाज पहायला मिळाला होता.काही दिवसांपूर्वीच मानसी, दीपाली सय्यद यांच्या स्पिन्स्टर पार्टीमधील फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत.

दरम्यान सध्या सिनेसृष्टीमध्ये लग्नाची धामधूम सुरू आहे. अभिज्ञा भावे-मेहुल पै प्रमाणेच काही दिवसांपूर्वी आशुतोष कुलकर्णी देखील विवाहबंधनात अडकला आहे. सध्या सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्याकडे देखील लवकरच सनई चौघडांचे सूर वाजणार आहेत. सध्या सोशल मीडियात त्यांच्या केळवणाचे फोटो चर्चेचा विषय आहे. मुंबई, पुण्यात अनेक कलाकारांच्या घरी त्यांनी केळवणं केली आहेत.