Manapman Teaser: 'कट्यार काळजात घुसली' नंतर आता सुबोध भावे 'मानापमान' संगीतमय चित्रपटाच्या माध्यमातून घेऊन येणार; पहा पहिली झलक
मानापमान। Photo Credits: Instagram/Subodh Bhave

अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे (Subodh Bhave) याने मानापमान या नव्या संगीतमय चित्रपटाची घोषणा केली आहे. संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकाचं सिनेमामध्ये रूपांतरण केल्यानंतर आता तो कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर (Krushnaji Khadilkar) यांच्या नाटकावर आधारित 'मानपमान' (Manapman) या नव्या सिनेमासाठी सज्ज झाला आहे. काल गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर त्याने सोशल मीडियात याची घोषणा करत पहिला टीझर शेअर केला आहे. यामध्ये कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात असली तरीही संगीत शंकर- एहसान-लॉय सांभाळणार आहेत तर निर्माते सुनिल फडतरे आहेत.

सुबोधचा हा नवा सिनेमा 'मानपमान' दिवाळी 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. काल गुढीपाडव्याला या सिनेमाची घोषणा इंस्टाग्राम वर करताच सिनेसृष्टीतील कलाकार आणि संगीत नाटकाच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान कट्यार काळजात घुसली हा सुबोधचा संगीत नाटकावरील पहिला सिनेमा नोव्हेंबर 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता पुन्हा संगीतमय सिनेमा घेऊन सुबोध रसिकांसमोर येणार आहे. (नक्की वाचा: Takatak 2 Motion Poster: ह्यावेळी जरा मोठ्ठा झालाय असे सांगत 'टकाटक 2' चे मोशन पोस्टर आले समोर, लवकरच होणार शूटिंगला सुरुवात).

 

View this post on Instagram

 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

कट्यार मधून प्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांनी अभिनेता म्हणून सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं होते तर महेश काळेला या सिनेमातील 'अरूणी किरणी' साठी सर्वोत्त्कृष्ट पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. दरम्यान संगीत मानापमान हे नाटक 1911 सालचं आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या नाटकाची निर्मिती ‘किलोस्कर संगीत मंडळींकडून’ करण्यात आली होती तर बालगंधर्वांनी त्यामध्ये काम केले होते.