Takatak 2 Motion Poster: ह्यावेळी जरा मोठ्ठा झालाय असे सांगत 'टकाटक 2' चे मोशन पोस्टर आले समोर, लवकरच होणार शूटिंगला सुरुवात
Takatak 2 Motion Poster (Photo Credits: Instagram)

सोशल मिडियापासून बॉक्स ऑफिसवर देखील तुफान गाजलेला मराठी चित्रपट 'टकाटक' (Takatak) चा लवकरच पार्ट 2 येणार आहे. एकाहून एक हॉट किसिंग सीन्स आणि बोल्ड सीन्सने भरलेला असा प्रयोग मराठीतून पहिल्यांदाच करण्यात आला होता. या चित्रपटाचा 'टकाटक 2' (Takatak 2) चा मोशन पोस्टर (Motion Poster) नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 'ह्यावेळी जरा मोठ्ठा झालाय' असे कॅप्शन देत हे मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे. त्याचबरोबर लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचेही सांगितले आहे. मिलिंद कवडे दिग्दर्शित टकाटक ला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सर्वांना या दुस-या पार्टची उत्सुकता लागली आहे.

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम तसेच सहनिर्माते जगत सिंग यांनी ‘टकाटक 2’ची अधिकृत घोषणा केली आहे. याप्रसंगी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टकाटक 2’चं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं.हेदेखील वाचा- Takatak Movie Song: मराठी चित्रपटातील पहिले बोल्ड गाणे 'ये चंद्राला' प्रदर्शित, अभिनेत्री प्रणाली भालेरावचे जलवे बघून फुटेल घाम

 

View this post on Instagram

 

A post shared by Takatak Film (@takatakfilm)

टकाटक 1 मध्ये प्रथमेश-रितिका श्रोत्री(Ritika shrotri) ही जोडी प्रथमच एकत्र पाहायला मिळाली होती. त्याचबरोबर अभिनेता अभिजीत आमकर-प्रणाली भालेराव(Abhijeet Amkar-Pranali Bhalerao) ही जोडी देखील पाहायला मिळाली. अभिजीत आणि प्रणालीचे हॉट सीन्स आणि ये चंद्राला या गाण्याने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला होता. टकाटक 2 मध्ये हेच कलाकार दिसणार की काही नवे चेहरे दिसणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

'टकाटक' या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्याने ‘टकाटक 2’च्या रुपात पुढील भाग आणण्याची कल्पना सुचल्याचं दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी सांगितलं.