भारतीय सिनेमा सृष्टीत आपली वेगळी छाप सोडणारे अभिनेता डॉ. श्रीराम लागू (Dr.Shriram Lagoo) यांच्या अतुलनीय कामगिरीच्या आधारावर महाराष्ट्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे मराठी नाट्यगृहातील उत्कृष्ट कलाकरांना डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र सरकारच्या सांकृतिक कार्य विभागाने (Maharashtra Government's Cultural Affairs Department) आज केली आहे. द नटसम्राट श्रीराम लागू (The Natsamrat Shriram Lagoo) असे या पुरस्काराला नाव देण्यात आले आहे. ही माहिती एएनआय या वृत्त संस्थेने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. डॉ. श्रीराम लागू यांनी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. सिनेमा सृष्टीतील एक चमकदार तारा पडद्याआड गेल्याने अनेक कलाकारांना मोठा धक्का लागला होता. श्रीराम लागू यांनी केवळ मराठीच नव्हेतर, हिंदी सिनेमातही काम केले आहे. त्यांच्या नावाने पुरस्काराची घोषणा करुन महाराष्ट्र सरकारने त्यांना मोठी श्रद्धांजली वाहली आहे.
डॉ. श्रीराम लागू हे सर्वोकृष्ट कलाकारासह एक ईएनटी सर्जन देखील होते. त्यांनी त्यांच्या कारकर्दीत चित्रपटांच्या व्यतिरिक्त मराठी नाटकांचे निर्देशनही केले आहे. श्रीराम लागू हे त्याच्या वयाच्या 80 ते 90 दशकाच्या दरम्यान एक महत्वपूर्ण चेहरा म्हणून प्रेक्षकांच्या समोर आले होते. श्रीराम लागू यांनी त्यांच्या कारकर्दीतील तब्बल 60 मराठी सिनेमात वेगवेगळी भुमिका साकरली आहे. 1990 नंतर त्यांची पडद्यावरील उपस्थिती कमी झाली. मात्र, ते नाट्यगृहांमध्ये सक्रिय राहिले. हे देखील वाचा- 'अमर अकबर अँथोनी' चित्रपटाला 43 वर्षे पूर्ण; अमिताभ बच्चन यांनी शेअर केला जुना फोटो
एएनआयचे ट्वीट-
Maharashtra Government's Cultural Affairs Department has announced an award in the name of actor Shriram Lagoo. The 'Natsamrat Shriram Lagoo' will be given for significant work in the Marathi theatre. (file pic) pic.twitter.com/mvINWDIgKM
— ANI (@ANI) March 2, 2020
नटसम्राट या नाटकात सर्वप्रथम श्रीराम लागू यांनी नटसम्राट म्हणून मुख्य भूमिका साकरली होती. या नाटकाला प्रसिद्ध लेखक कुसुमाग्र यांनी लिहले होते. या नाटकात त्यांनी साकारलेली नटसम्राटाची भुमिका आजही लोकांच्या डोळ्यासमोर आहे. या नाटकात त्यांनी आप्पासाहेब बेलवेलकर यांची भुमिका साकारलेली खूप गाजली होती. या अवस्मरणीय अभिनयानंतर लोक त्यांना नटसम्राट या नावाने ओळखू लागले. मराठी नाट्यगृहात या भूमिकेचा मान-सन्मान केला जातो. यामुळेच नाट्यगृहातील उत्कृष्ट कलाकरांना यापुढे नटसम्राट हे पुरस्कार देण्यात येणार आहे.