Luckee Title Track: सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडीत, सिद्धार्थ जाधव आणि उमेश कामत असं मल्टीस्टारर 'लकी' सिनेमाचं धमकेदार टायटल सॉंग रसिकांच्या भेटीला!
Luckee Title Track (Photo Credits: You Tube)

Luckee Title Track: दिग्दर्शक संजय जाधवच्या (Sanjay Jadhav) आगामी आणि बहुप्रतिक्षित 'लकी' सिनेमाच्या ट्रेलरला लोकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. यानंतर आता 'लकी'सिनेमाचं टायटल सॉन्ग आज रिलिज करण्यात आलं आहे. 'कोपचा' आणि 'माझ्या दिलाचो..' या गाण्यानंतर 'लकी' सिनेमाचं टायटल सॉंगदेखील तितकंच ठेका धरायला लावणारं आहे. संजय जाधवच्या 'लकी' सिनेमाच्या टायटल ट्रॅकमध्ये सई ताम्हणकर (Saie Tamhankar), तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि उमेश कामत (Umesh Kamat) खास अंदाजात पहायला मिळाले आहे. रॅपच्या अंदाजात त्यांनी हे गाणं सादर केलं आहे. Luckee Song Majhya Dila Cho:आळंदीच्या चैतन्य देवढेच्या आवाजात 'माझ्या दिलाचो..' कोंकणी बाजातलं गाणं, 'लकी' सिनेमातील नवं गाण 

संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' या सिनेमाच्या संगीताची धुरा अमितराज आणि पंकज पडघन या दोन संगीतकारांनी सांभाळली आहे. 'लकी' सिनेमाचं टायटल ट्रॅक अमितराज याने संगीतबद्ध केलं असून त्याच्यासोबत आरती केळकर या गायिकेने ते गायलं आहे. तर 'यो' म्हणजे सचिन पाठक याने हे गाणं लिहलं आहे. Luckee Trailer: अभय महाजन आणि दीप्ती सती यांच्यामधील धम्माल कॉमेडी आणि रोमॅंटिक सिनेमा 'लकी' चा ट्रेलर 

'लकी' सिनेमामध्ये अभय महाजन सोबत दीप्ती सती ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'लकी' सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 दिवशी रीलिज होणार आहे. बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दीपक राणे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.