NCB संचालक आणि पती समीर वानखेडे यांच्यावरील हल्ल्यानंतर क्रांती रेडकर हिची पोस्ट; पहा काय म्हणाली
Kranti Redkar (Photo Credits: Instagram)

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने इस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने काळजी वक्त करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले असून समीर वानखेडे ठीक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, काल ड्रग पेडलर्सकडून गोरेगाव येथे झालेल्या हल्ल्यात एनसीबीचे दोन अधिकारी जखमी झाले होते.

क्रांती रेडकर हिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "काळजी आणि शुभेच्छांबद्दल सर्वांना धन्यवाद. समीर वानखेडे ठीक आहेत. आम्ही सर्व घरीच असून त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. या हल्ल्यात खंबीरपणे लढा देणाऱ्या नारकोट्रीक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांना सलाम, तुम्ही आज आणि दररोजच आम्हाला अभिमानित करता. त्यासोबतच तिने #Courage #gallant #NationFirst हे हॅशटॅग जोडले आहेत." (Drug Peddlers Attacked On Sameer Wankhede: NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गोरगावमध्ये ड्रग पेडलरकडून हल्ला; 3 जणांना अटक)

पहा पोस्ट:

कॅरी मॅनडिस या ड्रग पेडलर सह तीन साथीदारांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. दरम्यान, या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आलं. यात अनेक बड्या  सेलिब्रिटींची नावं समोर आली असून त्यानंतर NCB अधिकाऱ्यांकडून बॉलिवूड मधील विविध कलाकारांची चौकशी करण्यात येत आहे.