Kartiki Gaikwad's Invitation to CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गायिका कार्तिकी गायकवाडने दिले विवाहासाठी आग्रहाचे निमंत्रण; वर्षा बंगल्यावर झाली भेट
Kartiki Gaikwad and CM Uddhav Thackeray (संग्रहित संपादित प्रतिमा)

‘सारेगमप’ लिटिल चॅम्पमुळे घराघरात पोहोचलेली गायिका कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) महाराष्ट्रातील एक लोकप्रिय चेहरा व आवाज आहे. कार्तिकीने अगदी लहान वयात संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करून टाकले होते. 26 जुलैला रोनित पिसे सोबत कार्तिकीचा साखरपुडा पार पडला होता. आता लवकरच कार्तिकी विवाहबंधनात अडकणार आहे. आता नुकतेच कार्तिकीने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना आपल्या विवाहाने निमंत्रण दिले. सध्या या घटनेचे फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. कार्तिकीने आपले वडील गायक-संगीतकार कल्याणजी गायकवाड यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

याआधी सोशल मिडियावर कार्तिकीव रोनितच्या पाहण्याचा कार्यक्रम झाला त्याचे फोटोज व्हायरल झाले होते. त्यानंतर 26 जुलै रोजी दोघांचा साखरपुडा पार पडला. कार्तिकीच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली, तरी ती डिसेंबर महिन्यात लग्नबेडीत अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. या लग्नासाठी कार्तिकीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. कार्तिकीच्या या विनंतीचा मान राखून ठाकरे परिवार तिच्या लग्नाला उपस्थित राहतो का नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (हेही वाचा: कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांचा साखरपुडा संपन्न, पहा या नव्या जोडीचे सुंदर फोटो)

दरम्यान, कार्तिकी व रोनितचे अरेंज मॅरेज आहे. रोनित पिसे मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. महत्वाचे म्हणजे रोनितला देखील संगीताची आवड आहे. त्याला उत्तम तबला वाजवता येतो. त्याने तबल्याच्या तीन परीक्षा देखील दिल्या आहेत. त्यामुळे हे कपल मिळून आता संगीताचा वारसा पुढे नेणार आहेत. तर कार्तिकीने 2009 साली झी मराठीच्या 'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स' हा शोद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने तिने कलर्स वाहिनीवरील ‘राइझिंग स्टार’ या रिअॅलिटी शो मध्येही सहभाग घेतला होता.