Bhaai - Vyakti Kee Valli Song Kanada Raja Pandharicha : भाई व्यक्ती की वल्ली सिनेमामध्ये 'कानडा राजा पंढरीचा' गाणं पुन्हा नव्या अंदाजात
'भाई- व्यक्ती की वल्ली' सिनेमात 'कानडा राजा ..' नव्या अंदाजात (Photo credits: You Tube)

Bhaai - Vyakti Kee Valli Song Kanada Raja Pandharicha : महाराष्ट्राचं लाडकं आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे पु.ल. देशपांडे (P.L.Deshpande)  मराठी साहित्य विश्वात 'भाई' अशी ओळख असणार्‍या या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू सिनेमातून पहिल्यांदाच रसिकांसमोर येणार आहे. आज या सिनेमातील पहिलं गाणं रिलीज 'कानडा राजा पंढरी'चा (Kanada Raja Pandharicha) नव्या ढंगात सादर करण्यात आलं आहे. Bhaai - Vyakti Kee Valli Trailer : पु.ल.देशपांडे यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर झळकणार, दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार सिनेमा

'कानडा राजा..' हे गाणं पंडीत वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांनी गायलं होतं. मात्र आता 'भाई व्यक्ती की वल्ली' या सिनेमामध्ये पुल देशपांडेंसोबत एका मैफिलीत कुमार गंधर्व, भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे असताना सावरे अयजय्यो ... आणि कानडा राजा सादर करताना दाखवलं आहे. नव्या स्वरूपातील या गाण्यामध्ये वसंतरावांच्या भूमिकेला त्यांचा नातू राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी आवाज दिला आहे. भीमसेन जोशींना 'जयतीर्थ मेवुंडी'ने (Jayateerth Mevundi)आवाज आहे तर कुमर गंधर्वांच्या भूमिकेला त्यांचा नातू भुवनेश कोमकली(Bhuvanesh Komkali)यांनी आवाज दिला आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'भाई- व्यक्ती की वल्ली' हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुर्वाध 4 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे तर 8 फेब्रुवारीला सिनेमाचा उत्तरार्ध प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये अभिनेता सागर देशमुख पु. ल देशपांडेच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.