गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शन निर्मित मराठी चित्रपट ‘जजमेंट’ (Judgement) एक नवीन गाणे नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ह्या गाण्याचे बोल आहेत ‘एल्गार’(Yalgaar). काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर आता या चित्रपटामधलं पहिलं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातून तेजश्री प्रधान(Tejshree Pradhan) आणि तिने पुकारलेल्या बंडावर भाष्य करण्यात आलं आहे. तेजश्री प्रधान ह्या चित्रपटात पहिल्यांदाच एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून, तिची ही भूमिका खूपच महत्त्वपूर्ण अशी असणार आहे.
'जजमेंट' चित्रपटातील 'एल्गार' गाणे
सुप्रसिद्ध गायक जावेद अली(Javed Ali) ह्यांच्या आवाजात असलेल्या हे गाणे नवल शास्त्री यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच मंदार चौलकर ह्या गाण्याचे गीतकार आहेत. हे गाणे एका मुलीला तिच्या प्रयत्त्नांना, तिच्या संघर्षाला प्रोत्साहन देणारे असे आहे. समीर सुर्वे दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते डॉ. प्रल्हाद खंदारे असून हर्षमोहन कृष्णत्रेय ह्या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत.
या चित्रपटामध्ये मंगेश देसाई(Mangesh Desai), तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत असून सतीश सलागरे, किशोरी अंबिये, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा भुजबळ आणि नुमायारा खान आदी कलाकार सुद्धा आहेत. येत्या २४ मे ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.