Jhimma | Photo Credits: YouTube Grab

लॉकडाऊन मधून शिथिलता मिळाल्यानंतर आता हळूहळू जनजीवन स्थिरावत आहे. सिनेसृष्टी देखील पुन्हा रूळावर येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत 'झिम्मा' (Jhimma) या आगामी सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. हेमंत ढोमे (Hemant Dhome) याने या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. काही दिवसांपूर्वी पहिल्या पोस्टर नंतर आज त्याने टीझर शेअर केला आहे. झिम्मा सिनेमामध्ये निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर दिसत आहे. इंग्लंडच्या ट्रीप जाणार्‍या या विविध वयोगटातील महिला त्यासाठी त्यांच्यासमोरील आव्हान आणि त्यांना ट्रीप ला घेऊन जाणारा गाईडच्या भूमिकेतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याची त्याकडे बघण्याची भूमिका याची झलक सिनेमाच्या टीझर मध्ये पहायला मिळाली आहे. Jhimma Poster Out: नव्या वर्षात खेळू आनंदाचा खेळ म्हणणाऱ्या 'झिम्मा' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; सिद्धार्थ चांदेरकर, सोनाली कुलकर्णीसह 'हे' स्टारकास्ट झळकणार.

 

दरम्यान अनेक दिवसांनी थिएटर मध्ये असा एक मल्टी स्टारर सिनेमा प्रदर्शित होत असल्याने त्याबद्दल सहाजिकच उत्सुकता आहे. या सिनेमामध्ये वयाच्या विविध टप्प्यावर असणार्‍या महिला पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये आपलं म्हणणं मांडताना कोणती भूमिका घेत आहेत हे पाहताना अनेकजणी त्यापैकी किमान एका व्यक्तीशी सहाजिकच स्वतःला रिलेट करू शकणार आहेत त्यामुळे हा सिनेमा कोणता संदेश देणार हे पाहण्यासाठी सिनेमा पहावा लागणार आहे.

झिम्मा टीझर

23 एप्रिल 2021 हा सिनेमा रिलीज होणार आहे. 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित हा सिनेमा आहे. या सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे तर चित्रपटाला अमितराज यांचे संगीत आहे. छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.