Bigg Boss Marathi 2 ची स्पर्धक Heena Panchal चा 'मोगली' गाण्यावरील हॉट डान्स भोजपुरी अभिनेत्रींनाही टाकेल मागे, Watch Video
Heena Panchal Mogli Song (Photo Credits: YouTube)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) मध्ये आपल्या हॉटनेसचा तडका मारत खूपच चर्चेत आलेली अभिनेत्री हिना पांचाळ (Heena Panchal) हिचे 'मोगली' (Mogli) हे मराठी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. टिप्स मराठी प्रस्तुत या गाण्यामध्ये हिना पांचाळने आपल्या हॉटनेसचा तडका मारत या गाण्याला चार चांद लावले आहेत. तमाम रसिक प्रेक्षकांना वेड लावणारे 'मजनू झाला मोगली' हे गाणे युट्यूबवर प्रदर्शित झाले असून सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यामध्ये हिना पांचाळ सोबत जॉन हा सहकलाकार दिसत आहे. हे गाणे प्रकाश प्रभाकर आणि लारिसा आलमेडा यांनी गायले आहे.

या गाण्यामध्ये हिना पांचाळ हिने लाल रंगाचा हाफ लेहंगा घातला आहे. या गाण्यातील तिच्या मूव्हस आणि तिच्या मादक अदा भोजपुरी अभिनेत्रींना देखील मागे टाकतील.हेदेखील वाचा- Heena Panchal Red Hot Photos: मराठी बिग बॉस 2 मधील स्पर्धक हिना पांचाळ हिच्या लाल रंगाच्या मिनी ड्रेसमधील ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले घायाळ

बिग बॉस मराठी 2 मध्ये हीना पांचाळने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री केली होती. तिच्या येण्याने बिग बॉसच्या घरातील ग्लॅम फॅक्टर अधिक वाढला असं म्हणायला हरकत नाही. मात्र हीनाला ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचण्याआधीच शोमधून एक्झिट घ्यावी लागली होती. यातील तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज प्रेक्षकांना भावला.

दरम्यान सोशल मिडियावरही हिना प्रचंड सक्रिय असते. आपले हॉट फोटोज आणि व्हिडिओजच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना खूश करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर 551k फॉलोअर्स आहेत.