Happy Friendship Day 2020: लॉकडाउन स्पेशल फ्रेंडशिप डे निमित्त मित्रमैत्रिणींना 'ही' हिट गाणी समर्पित करुन करा त्यांंचा दिवस खास (Watch Video)
Friendship Day Special Marathi Songs (Photo Credits: Youtube)

Friendship Day 2020: भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजेच आज, 2 ऑगस्ट रोजी मैत्री दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी या खास दिवशी अनेकांचे आपल्या मित्रांसोबत खास प्लॅन्स असतात मात्र यंंदा लॉकडाउन (Lockdown) मुळे सर्वच घरी अडकल्याने या प्लॅनिंंग वर पाणी फिरले आहे. तरी काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या मित्रांचा दिवस अजुनही खास करु शकता. एक आयडिया आहे, आज तुम्ही तुमच्या मित्रांना आवडेल असं एखादं गाणं  त्यांंना पाठवुन शुभेच्छा देउ शकाल, किंंबहुना तुम्हाला गाण्याची आवड असेल तर तुम्ही ही गाणी स्वतः गाऊन सुद्धा छान सरप्राईज देउ शकाल, आता अशी मैत्री स्पेशल गाणी शोधण्याची मेहनत सुद्धा तुम्हाला पडु नये याची सोय सुद्धा आम्ही केली आहे. मराठी मध्ये गाजलेली ही काही मैत्रीची गाणी तुम्ही Whatsapp, Facebook च्या माध्यमातुन पाठवुन फ्रेंडशिप डे खास करु शकता.

आणखीन एक महत्वाचं म्हणजे, तुम्हाला आज प्रत्यक्ष भेटता येणार नाहीये पण ऑनलाईन शुभेच्छा तर देउ शकाल, यासाठी हॅप्पी फ्रेंडशिप डे म्हणताना मराठी Messages, Whatsapp Status शेअर करून द्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Friendship Day Special Songs

या फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने या शुभेच्छांसोबतच तुम्हाला तुमच्या मित्राचा दिवस आणखीन खास करता येईल. यासाठी एखादा पर्सनल संदेश सुद्धा लिहून पाठवू शकता. व्हिडीओ कॉल करून त्यांच्याशी गप्पा मारू शकता.  शिवााय तुम्हा सर्व वाचक मित्रांंना लेटेस्टली परिवाराकडुन Happy Friendship Day!