Sameer Vidwans | (Photo Credit: Facebook)

यंदाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019 (National Film Award) सोहळा राजधानी दिल्ली येथील विज्ञान भवन यथे सोमवारी (24 डिसेंबर 2019) पार पडला. यंदा या पुरस्काराचे 66 वे वर्ष होते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण देशाचे महामहीम राष्ट्रपती करत असतात. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ ही परंपरा कायम होती. मात्र, गेले आणि यंदाचे वर्ष (2018-19) या परंपरेला अपवाद ठरले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind) यांच्या हस्ते या पुरस्कारांचे या दोन्ही वर्षी वितरण पार पडले नाही. गेल्या वर्षी हे पुरस्कार राष्ट्रपती कोविंद यांच्या ऐवजी तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि यंदा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्या हस्ते पार पडले. त्यामुळे यंदाही राष्ट्रपती पुरस्कार वितरण सोहळा वादात सापडला आहे. दरम्यान, या वादाचाच धाका पकडत धुरळा चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस (ameer Vidwans) यांनी राष्ट्रपीत कोविंद यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. मानाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना तीन तासांसाठी वेळ काढता येत नाही का? असा सवालच विद्वांस यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या ट्विटर हँडलवरुन संताप व्यक्त करताना समीर विद्वांस यांनी म्हटले आहे की, ''मागच्या वर्षीपासून हे काय नवीन सुरू झालंय? ‘राष्ट्रपती’ पदक द्यायला सन्मा. राष्ट्रपतींना ३ तास काढता येत नाहीत? मान्य आहे की आपल्या देशात राष्ट्रपती खूऽऽऽप व्यस्त असतात पण हे ‘राष्ट्रीय’ पुरस्कार आहेत, ह्याआधीचे सर्व काढतच होते की वेळ! त्यांच्या वेळेनुसारच सगळं आयोजीत होतं ना!''

समिर विद्वांस ट्विट

दरम्यान, गेल्या वर्षीही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा वादात सापडला होता. नेहमीप्रमाणे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरणाची तारीख आणि वेळ जाहीर झाली. मात्र, दरम्यानच्या काळात या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपटांचे पुरस्कार वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार नसल्याचे समजताच हे पुरस्कार स्वीकारण्यावरच काही कलाकारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, राष्ट्रपतींच्या भूमीकेवरही अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती. (हेही वाचा, 66th National Film Awards 2019: अक्षय कुमार, विक्की कौशल, आयुष्मान खुराना हे परस्काराचे मानकरी (Watch Videos)

Sameer Vidwans | (Photo Credit: Facebook)

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण करण्याबाबत राष्ट्रपतींकडून पुनरावृत्ती घडल्याने अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या चित्रपट सोहळ्यात आयुषमान खुराना(Ayushmann Khurrana), विक्की कौशल (Vicky Kaushal) यांना अनुक्रमे ‘अंधाधून’, ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गैरविण्यात आले. तर दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेश हिला ‘महानती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्या आले. तर सुरेखा सीकरी यांना ‘बधाई हो’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला.