66th National Film Awards 2019: अक्षय कुमार, विक्की कौशल, आयुष्मान खुराना हे परस्काराचे मानकरी (Watch Videos)
National Film Awards 2019 (Photo Credits: Twitter)

National Film Awards 2019: अखेर नॅशनल अवॉर्ड्स सोहळा आज नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात अत्यंत उत्साहात पार पडला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी हे पुरस्कार विजेत्यांना दिले आहेत. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्काराचे विजेते अमिताभ बच्चन मात्र या सोहोळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. काल संध्याकाळी  त्यांना ताप भरला असल्याने ते येऊ शकले नाहीत असे सांगण्यात आले.

उप-राष्ट्रपती नायडू यांनी भाषणात श्री. बच्चन यांना 'स्वतः एक संस्था' असे संबोधले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी परदेशात, विशेषत: चीनमधील भारतीय चित्रपटांची लोकप्रियता लक्षात घेतली. सर्वोत्कृष्ट अभिनेते आयुष्मान खुराना आणि विक्की कौशल, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि अक्षय कुमार यांचा समावेश असलेल्या काही पुरस्कारांचा विशेष उल्लेख त्यांनी केला. तसेच अक्षयच्या पॅडमॅन चित्रपटाने सोशल इश्यूवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 5 लाखांवरुन थेट 75 हजारावर

या सोहोळ्यामुळे अनेक पुरस्कार विजेत्यांना उत्तेजन मिळाले - व्हीलचेयरवर बक्षीस मिळविणारी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. सिक्री यांना 'बधाई हो' मधील अभिनयाबद्दल पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचे पारितोषिक - 'पद्मावत' साठी संजय लीला भन्साळी आणि 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'साठी शाश्वत सचदेव यांना मिळाले. ओंडल्ला एरदल्लासाठी पी व्ही रोहीथ, नाळसाठी श्रीनिवास पोकळे, हरजितासाठी समीप रानौत आणि हमीदसाठी तल्हा अर्शद रेशी या चौघांना सर्वोत्कृष्ट बाळ कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.