
Naal 2 Movie Teaser: नागराज मंजुळे निर्मित 'नाळ' चित्रपट हा एक यशस्वी चित्रपटापैंकी एक आहे. २०१८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला, नाळ चित्रपटाच्या भरघोष यशानंतर आता नाळ २ या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आल होत तर काही तासांपुर्वी या चित्रपटाचं टीझर रिलीज करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या टीझरनेधुमाकुळ घातला आहे. या चित्रपटातील 'आई मला खेळायला जाऊ देना' या गाण्याने तर प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली होती.
सुधाकर रेड्डी यक्कंटीयांनी नाळ , नाळ २ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. टीझर पाहून प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे. या चित्रपटात कोण कोणत्या भुमिकेत असणार याची उस्तुकता लागली आहे. तर हा चित्रपट येत्या १० नोव्हेंबर दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. टीझर मध्ये दिसल्याप्रमाणे चैत्या हा आता त्याच्या खऱ्या आई कडे निघाला तर आहे पण यात त्याचा प्रवास कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनी लागली आहे.
या चित्रपटानं राष्ट्रीय पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांना राष्ट्रीय पुरस्कार, सुवर्ण पदक, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आलं. त्यामुळे नाळ २ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच गर्दी करणार आहे.