Wedding Cha Shinema Trailer (Photo Credits: You Tube)

Wedding Cha Shinema Official Trailer:  संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी (Dr Saleel Kulkarni) आगामी 'वेडिंगचा शिनेमा' या मराठी सिनेमातून दिगदर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. या सिनेमाच्या टीझर आणि फ्रेश गाण्यांनंतर रसिकांना ट्रेलरची प्रतिक्षा होती. आज या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. एका मराठी सधन कुटुंबातील लग्नाची लगबग हा या सिनेमाचा मूळ विषय आहे. जसा काळ सरला तशा लग्नाच्या सेलिब्रेशनमध्येही बदल झाले आहेत. लग्नाच्या पारंपारिक चालीरिती आणि आजच्या तरुणाईचं प्री-वेडिंग फोटोग्राफीची हौस याची सांगड घालता -घालता होणारी दमछाक, थोडे रुसवे फुगवे आणि धम्माल कॉमेडी 'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटामध्ये पहायला मिळणार आहे. ‘वेडिंगचा शिनेमा’ साठी सलील कुलकर्णी यांनी घेतलं ऑनलाईन ऑडिशन; सौरभ शिरसाट आणि स्वरूपा बर्वे यांच्या आवाजात रेकॉर्ड होणार 'कुनीबी कसंबी घालुदे पिंगा' गाणं

वेडिंगचा शिनेमा चित्रपटाचा ट्रेलर 

मुक्ता बर्वेभाऊ कदमशिवाजी साटमअलका कुबलसुनील बर्वेअश्विनी काळसेकरप्रवीण तरडेसंकर्षण कऱ्हाडेप्राजक्ता हणमगरयोगिनी पोफळे हे आघाडीचे कलाकार या चित्रपटात आहेत. शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही जोडी या चित्रपटातून प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे.  डॉ. सलील कुलकर्णी - संदीप खरे  ही महाराष्ट्राची लाडकी संगीतकार -कवी जोडीने चित्रपटाच्या संगिताची बाजू सांभाळली आहे.  डॉ. सलील कुलकर्णी यांनी वेडिंगचा शिनेमा'ची कथापटकथासंवादसंगीत आणि दिग्दर्शन सारेच सांभाळले आहे. 

'वेडिंगचा शिनेमा'ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीची आहे. 12 एप्रिल 2019ला सिनेमा रीलिज होणार आहे.