‘वेडिंगचा शिनेमा’ साठी सलील कुलकर्णी यांनी घेतलं ऑनलाईन ऑडिशन; सौरभ शिरसाट आणि स्वरूपा बर्वे  यांच्या आवाजात रेकॉर्ड होणार 'कुनीबी कसंबी घालुदे पिंगा' गाणं
Wedding Cha Shinema (Photo Credits: File Photo)

Wedding Cha Shinema Song:  'वेडिंगचा सिनेमा' या आगामी मराठी सिनेमामधून डॉ. सलील कुलकर्णी (Dr. Saleel Kulkerni) पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून रसिकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या पहिल्याच सिनेमात सलीलने चित्रपटातील एका गाण्यासाठी चक्क ऑनलाईनची घोषणा केली आणि दोन होतकरू गायकांना संधी दिली आहे. माजलगावचा सौरभ शिरसाठ (Saurabh Shirsaat) आणि कोल्हापूरची स्वरूपा बर्वे (Swaroopa Barve)  या दोन नवोदित गायकांना सलील कुलकर्णी संधी देणार आहेत. देशा परदेशातील सुमारे 412 गायकांमधून त्यांची निवड करण्यात आली आहे.

सौरभ शिरसाठ आणि कोल्हापूरची स्वरूपा बर्वे यांची निवड  

“कुनीबी कसंबी घालुदे पिंगा, बाशिंगाचा कळतोच इंगा.... कसा न कळला कधी न कळला, माझा बी जमलाय जोडा... माझ्या वेडिंगचा शिनेमा काढा...,” असे गाण्याचे बोल आहेत. संदीप खरे याने हे गाणं लिहलं आहे. 'वेडिंगचा सिनेमा' या सिनेमातील तीन गाणी याआधीच प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याला रसिकांकडून उत्तम प्रतिसादही मिळत आहे. आता हे चौथं गाणं कसं असेल याबद्दल रसिकांच्या मनात उत्सुकता आहे.

Saurabh Shirsaat And Swaroopa Barve

शिवाजी साटम, अलका कुबल, मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर या आघाडीच्या कलाकारांबरोबरच भाऊ कदम, प्रवीण तरडे, हे कलाकारसुद्धा या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.