Best Marathi Movies of 2019: 'आनंदी गोपाळ' यांच्यातील अतूट नातं ते 'हिरकणी' ची शौर्यगाथा, हे आहेत या वर्षातील Top 10 मराठी चित्रपट
Marathi Movies 2019 (Photo Credits: Facebook)

Best Marathi Movies: 2019 हे वर्ष तसं बघायला गेलं तर मराठी सिनेसृष्टीसाठी तितकंसं लाभदायक ठरलं नाही. कारण या वर्षात एकूण प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची संख्या जरी 30 पेक्षा अधिक असली तरी हाताच्या बोटांवर मोजण्या इतपतच सिनेमे प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरले. त्यातील 'आनंदी गोपाळ' यांच्यातील अतूट नात्याने तर प्रेक्षकांना भावुक केलंच पण त्याहीसोबत 'हिरकणी' च्या शौर्यगाथेने इतिहासातील एक सुवर्ण पान प्रेक्षकांपुढे उलगडलं. चला तर पाहूया 2019 मधील Top 10 मराठी चित्रपट.

आनंदी गोपाळ

एकोणिसाव्या शतकातील एका सर्वसाधारण दाम्पत्याची अनन्यसाधारण गोष्ट म्हणजे 'आनंदी गोपाळ'. फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना सिनेगृहात खेचून तर आणलंच पान त्याहीसोबत चित्रपटाच्या कथानकाच्या त्यांना हळवं देखील केलं. या सिनेमात विशेष उल्लेख केला गेला तो कलाकारांच्या अभिनयाचा. ललित प्रभाकर याने साकारलेले गोपाळराव आणि भाग्यश्री मिलिंद हिने साकारलेल्या आनंदीबाई, ही पात्र खूपच कौतुकास्पद ठरली. सिनेमाचं चित्रीकरण सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आलं आहे.

ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा हिंदी तसेच मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामे केली. चित्रपटातील कथानक हे सत्य घटनांवर आधारित असल्याने प्रेक्षकांनाही त्याच्याशी जुळवून घेता आले. चित्रपटात सर्वात उल्लेखनीय कामगिरी केली आहे ती नवाजुद्दीन सिद्दीकी याने. नवाजने अगदी हुबेहूब ठाकरे मोठ्या पडद्यवर साकारले आहेत.

खारी बिस्कीट

दोन लहानग्या भावंडांची निरास गोष्ट म्हणजे खरी बिस्कीट. लहान मुलांच्या आयुष्यात किती स्वछंदपणे जगतात हे चित्रपटाच्या कथानकातून दाखवायचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. चित्रपटाचं कथानक तसं छोटं असलं तरी या चित्रपटात खऱ्या अर्थाने जीव आणला आहे तो त्यातील बालकलाकारांनी. वेदश्री खाडिलकर या चिमुरडीने अंध असलेल्या खारीची भूमिका साकारली आहे तर आदर्श कदम या बालकलाकाराने तिच्या भावाचं म्हणजेच बिस्कीटचं पात्र साकारलं आहे.

हिरकणी

महाराष्ट्रातील एका शूर आईची शौर्यगाथा म्हणजे हिरकणी. सोनाली कुलकर्णीने साकारलेली हिरकणीची भूमिका प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरली. हा चित्रपट इतिहासातील एका सुवर्ण काळाला हात घालतो आणि आईची माया किती अगाध आहे हे दाखवून देतो. या चित्रपतील गाणीसुद्धा तितकीच गाजली.

गर्लफ्रेंड

प्रेम कसं करावं हे शिकवणारी गोष्ट म्हणजे गर्लफ्रेंड. अमेय वाघने चित्रपटात नचिकेत ही प्रमुख भूमिका साकारली आहे तर सई ताम्हणकर सोबतची त्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा नक्कीच एन्जॉय करता येईल अशी आहे. एखाद्याला नकळत कसं प्रेम होऊ शकतं हे या चित्रपटात उत्तमरित्या मांडलं आहे.

धप्पा

एक गंभीर विषय असूनही तितक्याच ताकदीने मांडलेला सिनेमा म्हणजे 'धप्पा'. एका सध्या आणि सोप्या गोष्टीतून अनेक महत्त्वाचे विचार कसे मांडता येतात हे लेखक गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी सहजपणे दाखवून दिले आहे. चित्रपटात सर्वच बालकलाकारांच्या भूमिका अगदी उत्तम रित्या साकारण्यात आल्या आहेत.

फत्तेशिकस्त

शिवरायांच्या पराक्रमाचे दर्शन घडवून देणारा चित्रपट म्हणजे 'फत्तेशिकस्त'. चित्रपटाचं कतहानक हे छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात घुसून शाहिस्तेखानावर केलेल्या हल्ल्यावर आधारित आहे. अनेक बड्या कलाकारांची फौज या सिनेमात आपल्याला पाहायला मिळते. पण त्यातही चिन्मय मांडलेकर याने साकारलेले शिवाजी महाराज आणि मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेल्या जिजाऊसाहेब उल्लेखनीय आहेत.

ये रे ये रे पैसा 2

टेन्शन फ्री होण्यासाठी एखादा करमणूक करणारा चित्रपट पाहायचा असेल तर ये रे ये रे पैसा 2 हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. ये रे ये रे पैसा हा चित्रपट गेल्याच वर्षी प्रदर्शित झाला होता. त्याचाच सिक्वल म्हणजे हा पार्ट 2. मराठीत असे धमाल चित्रपट फार कमी बनतात त्यामुळे खळखळून हसायचं असेल तर ये रे ये रे पैसा 2 नक्की पाहा.

ती आणि ती

मराठीत रॉमकॉम म्हणजेच रोमँटिक कॉमेडी असे चित्रपट फार क्वचितच बनतात. त्यातीलच एक म्हणजे 'ती आणि ती'. पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे अभिनित 'ती आणि ती' या चित्रपटाचा लुक खूपच फ्रेश आहे. त्याचं चित्रीकरण लंडनला करण्यात आलं आहे आणि मृणाल कुलकर्णी यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

'Dhurala' Star Cast Poster Out: सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी यांच्यासह मराठीतील 'या' लोकप्रिय कलाकारांवर रंगांची उधळण करणा-या 'धुरळा' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Best Marathi Movies Of 2019: आनंदी गोपाळ ते हिरकणी,हे आहेत या वर्षातील Top 10 मराठी चित्रपट

ट्रिपल सीट

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ट्रिपल सीट या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई झाली. एक हिरो आणि दोन नायिका असणारे बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट आहेत. त्याचाच मराठीतील पर्याय म्हणजे हा चित्रपट. चित्रपटात उल्लेखनीय कामगिरी केली आहे ती शिवानी सुर्वे या अभिनेत्रीने. शिवानी आणि अंकुश मधली केमिस्ट्री तुम्हाला नक्कीच आवडेल.