'सविता भाभी' नावाचा उल्लेख काढावा लागणार; ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटावर कॉपीराईट चा ठपका !
Ashleel Udyog Mitra Mandal (PC - Instagram)

'सविता भाभी' (Savita Bhabhi) तू इथचं थांब, या होर्डिंगमुळे मागील महिन्यात पुणे शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर हे पोस्टर मागचं कारण सर्वांसमोर आलं होतं. 'अश्लील उद्योग मित्र मंडळ’ (Ashleel Udyog Mitra Mandal) या नावाचा एक मराठी चित्रपट (Marathi Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील ‘सविता भाभी’ हे पात्र खूपचं गाजलं. परंतु, आता या चित्रपटातून 'सविता भाभी' या नावाचा उल्लेख काढून टाकण्यात येणार आहे.

या पात्राच्या कॉमिक कॉपीराइटवरून (Copyright Issue) चित्रपटाच्या निर्मात्यांना निलेश गुप्ता (Nilesh Gupta) यांनी कायदेशीर नोटीस पाठविली होती. त्यामुळे या चित्रपटात ‘सविता भाभी’ या पात्राच्या नावाचा उल्लेख नसणार आहे. 'सविता भाभी' या काल्पनिक पात्राचे कॉपीराईट निलेश गुप्ता यांच्याकडे आहेत. परंतु, असे असताना चित्रपटाच्या निर्मात्याने निर्मात्यांने निलेश गुप्ता यांच्याकडे कोणतीही परवानगी मागितली नाही. त्यामुळे गुप्ता यांनी 'अश्लील उद्योग मित्र मंडळ' चित्रपटाच्या निर्मात्यांना यासंदर्भात नोटीस पाठवली होती. त्यानुसार, चित्रपट निर्मात्याला 58 ठिकाणी ‘सविता भाभी’ या नावाचा उल्लेख म्यूट करावा लागणार आहे. (हेही वाचा - Sandeep Aur Pinky Faraar Trailer: अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्या 'संदीप और पिंकी फरार' सिनेमाचा ट्रेलर आऊट)

 

View this post on Instagram

 

Ashleel Udyog Mitramandal Trailer #6March #GT #twentytwenty #daintytwenty

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता आलोक राजवाडे करत आहे. तसेच या चित्रपटात ‘सविता भाभी’ या पात्राची व्यक्तीरेखा अभिनेत्री सई ताम्हणकर साकाणार आहे. या चित्रपटात पर्ण पेठे, अभय महाजन, सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतूराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके आणि अमेय वाघ हे कलाकार महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.