Sandeep Aur Pinky Faraar Trailer: अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्या 'संदीप और पिंकी फरार' सिनेमाचा ट्रेलर आऊट
अर्जून कपूर आणि परिणीती चोप्रा यांचा 'संदीप और पिंकी फरार' हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे.
Sandeep Aur Pinky Faraar Trailer: 'इश्कजादे' आणि 'नमस्ते इंग्लंड' या सिनेमानंतर अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) या जोडीचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'संदीप और पिंकी फरार' (Sandeep Aur Pinky Faraar) असे या सिनेमाचे नाव असून सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाच्या ट्रेलरवरुन हा सस्पेंस ड्रामा असल्याचे भासते. त्यामुळे अर्जुन-परिणीतीचा वेगळा अंदाज सिनेमात पाहायला मिळेल, अशी आशा आहे. (अर्जुन कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा पैकी कोण आहे 'Best Kisser', सांगतेय परिणिती चोपड़ा)
अर्जुन-परिणीती यांच्यासह नीना गुप्ता, रघुवीर यादव आणि जयदीप अहलूवालिया या कलाकारांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाच्या कथानकात अनेक ट्विस्ट असल्याचे ट्रेलरवरुन वाटत आहे. त्यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. सिनेमाची घोषणा करण्यात आल्यानंतर सिनेमाची कथा हलकी-फुलकी असेल असे वाटले होते. मात्र ट्रेलरने प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (एव्हरग्रीन अभिनेत्री 'जीनत अमान' रुपेरी पडद्यावर करणार कमबॅक, अभिनेता अर्जुन कपूर ही असणार महत्त्वपुर्ण भूमिकेत)
पहा ट्रेलर:
दिबाकर बनर्जी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून अनु मलिक यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. यापूर्वी दिबाकर यांनी 'तितली' आणि 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी' हे सिनेमे दिग्दर्शित केले होते. बराच काळापासून लांबणीवर पडलेला 'संदीप और पिंकी फरार' हा सिनेमा अखेर 20 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. याच दिवशी इरफान खान, करीना कपूर खान यांचा 'अंग्रेजी मीडियम' सिनेमा देखील प्रदर्शित होत असल्याने दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2020 04:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

