अर्जुन कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा पैकी कोण आहे 'Best Kisser', सांगतेय परिणिती चोपड़ा
Parineeti Kissing scene (Photo Credits: YoutTube)

आपल्या निरागस आणि निखळ हास्याने तसेच दमदार अभिनयाने आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या आवडती बनलेली नायिका म्हणजे परिणिती चोपड़ा (Parineeti Chopra). अभिनेत्री प्रियांका चोपड़ा हिची चुलत बहिण असली तरी परिणिती ने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली. परिणितीने आतापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसोबत काम केले. त्यात तिने अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ला दिलेले किस मात्र प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले. मात्र जेव्हा खुद्द परिणितीला कोण या दोघांपैकी कोण चांगला किसर आहे असे विचारल्यास तिने दिलेले उत्तर हे खूपच आश्चर्यचकित करणारे होते. अभिनेत्री नेहा धुपियाच्या शो (Neha Dhupia) मध्ये नेहाने परिणितीला हा प्रश्न विचारला.

नेहा ने जेव्हा परिणितीला विचारले अर्जुन कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा मध्ये कोण चांगला किसर आहे, तेव्हा परिणिती म्हणाली की, "अर्जुन आणि माझ्यामध्ये खूप चांगले नातं आहे. मी जेव्हा त्याच्या सोबत असते तेव्हा मी ती व्यक्ती असते जी मी माझ्या ख-या आयुष्यात आहे. त्यामुळे अर्जुन आणि सिद्धार्थमध्ये मी अर्जुन चे नाव घेईन."

परिणिती चोपड़ा ने याआधी अर्जुन कपूर सोबत 'इश्कजादे' आणि 'नमस्ते इंग्लंड' या चित्रपटात काम केले होते. त्याशिवाय ही जोडी 'संदीप और पिंकी फरार' या चित्रपटात एकत्र दिसेल.

Kesari Song Sanu Kehndi: केसरी सिनेमातील पंजाबी तडका असलेले 'सानू केंदी' गाणे रसिकांच्या भेटीला!

त्याचबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा सोबत परिणिती ने 'हंसी तो फंसी' या चित्रपटात काम केले होते. तसेच ही परिणती-सिद्धार्थ ही जोडी 'जबरिया जोड़ी' या चित्रपटात एकत्र दिसतील.