...आणि डॉ.काशिनाथ घाणेकर सिनेमात नव्या स्वरूपात 'गोमू संगतीनं .... ' गाणं रसिकांच्या भेटीला (Video)
'गोमू संगतीनं.. ' Photo Credit : Youtube

यंदा दिवाळीमध्ये सुबोध भावे अभिनित ...आणिडॉ.काशिनाथ घाणेकर हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. मराठी रंगभूमीवरील पहिला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकरांचा जीवनपट या सिनेमातून उलगडला जाणार आहे. सुबोध भावे या सिनेमात डॉ. काशिनाथ घाणेकरांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. टीझर आणि ट्रेलरनंतर काशिनाथ घाणेकरांच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक, 'गोमू संगतीनं...' रिलीज करण्यात आलं आहे.

सुबोध भावे आणि प्राजक्ता माळी एकत्र

गोमू संगतीनं या गाण्यामध्ये काशिनाथ घाणेकरांसोबत अभिनेत्री आशा काळे या सिनेमात झळकल्या होत्या. 1976 सालच्या 'हा खेळ सावल्यांचा..' या चित्रपटातील गाणं आजही लोकांच्या ओठांवर आहे. आशा भोसले आणि हेमंतकुमार यांनी हे गाणं गायलं आहे. ...आणिडॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमाच्या निमित्ताने या गाण्याला नव्या स्वरूपात सादर करण्यात आलं आहे. कपड्यांपासून अगदी डान्स स्टेप्सपर्यंत सारे अगदी हुबेहुब सादर करण्यात आले आहे.

कसं होतं नवं गाणं ? 

दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 8 नोव्हेंबरला सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावे सोबतच प्रसाद ओक, सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी दिग्गजांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर या सिनेमात हे कलाकार साकारणार दिग्गजांच्या भूमिका