AniDrKashinathGhanekar Trailer ; सुबोध भावे प्रमुख भूमिकेत, दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार सिनेमा
Aani Kashinath Ghanekar | (Photo Credits- Facebook @vmpmarathi)

मराठी नाट्यसृष्टीतला पहिला सुपरस्टार अशी ओळख असणारे डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवन प्रवासावर बेतलेला चित्रपट 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या टीजर मध्ये सर्व कलाकारांची ओळख करून देण्यात आली होती तर दुसरा टीजर हा पूर्णपणे डॉक्टरांवर होता. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे  हा घाणेकरांच्या प्रमुख भूमिकेत आहे. मुंबईत पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. तत्पूर्वी  सुबोध भावेने आपल्या इंस्टाग्राम पेज वरून कार्यक्रमास्थळी उदय डाबळ यांनी रेखाटलेल्या डॉ.काशिनाथ घाणेकर यांच्या चित्राचा फोटो शेअर करण्यात आला आहे.  नक्की वाचा: 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाचा दुसरा टीजर प्रदर्शित.

पहा आणि.. डॉ. काशिनाथ घानेकारचा ट्रेलर

पहा सुबोध भावेची  इंस्टाग्राम  पोस्ट

 

'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर हा चित्रपट अभिजित देशपांडेनी दिग्दर्शित केला असून वायाकॉम१८ मोशन पिक्चर्सची प्रस्तुती आहे. या चित्रपटात सुबोध भावे सोबत सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, आनंद इंगळे, प्रसाद ओक, नंदिता धुरी आणि सुहास पळशीकर प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर या सिनेमात हे कलाकार साकारणार दिग्गजांच्या भूमिका