सायबर क्राईम: माझं इन्स्टाग्राम अकाऊंट अज्ञाताकडून हॅक: अमृता खानविलकर
Amruta Khanvilkar's Instagram account hacked | (Photo Credits: Instagram)

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक (Instagram Account Hacked) झाल्याचा दावा केला आहे. अमृताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन माहिती देत हा दावा केला आहे. हा दावा करताना आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये अमृताने म्हटले आहे की, 'माझं इन्स्टा हॅक करण्यात आलं आहे. मी सध्या फोनमध्ये अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे इन्स्टाच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधत आहे.'

आपल्या पोस्टमध्ये अमृता पुढे म्हणते की, अज्ञात व्यक्तीने माझं इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram Account) हॅक केले आहे. या अकाऊंटवरुन जर तुम्हाला कोणता संदेश, छायाचित्र, व्हिडिओ आला तर तो मेसेज मी किंवा माझ्या टीममधील कोणा व्यक्तीने तो पाठवला किंवा शेअर केला आहे असे समजू नका. ज्या हॅकरने माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केले त्या व्यक्तीने माजा इमेल आयडीही हॅक करण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगत या सर्व प्रकाराबाबत आपण तक्रार केल्याचेही अमृताने म्हटले आहे. (हेही वाचा, व्हिडिओ: ' बेडरुममध्ये त्याला खूप वेळ हवा असतो' दीपिकाने सांगितले रणीवीरचे सिक्रेट)

अमृता खानवीलकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. तसेच, टीव्हीच्या पडद्यावरही तिचा वावर असतो. अभिनेत्री अलिया भट्ट हिच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या राझी चित्रपटातून अमृता चाहत्यांच्या भेटीला आली होती.