व्हिडिओ: ' बेडरुममध्ये त्याला खूप वेळ हवा असतो' दीपिकाने सांगितले रणीवीरचे सिक्रेट
Ranveer, Deepika bedroom secrets | (Photo Credits: Instagram)

Ranveer, Deepika Bedroom Secrets: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हे दोघे म्हणजे बॉलिवुडमधील चर्चित कपल. गेल्यावर्षीच हे कपल विवाहबद्ध झाले. दोघांच्याही चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. आता या चाहत्यांना उत्सुकता असते ती पती पत्नी म्हणून हे दोघे कसे असतील. दरम्यान, चाहत्यांची ही उत्सुकता दीपिका पदुकोण हिने काही प्रमाणात दूर केली. रणवीर सिंगसोबतची काही बेडरुम सिक्रेट (Bedroom Secrets) दीपिकाने एका कार्यक्रमात शेअर केली. ही सिक्रेट्स ऐकूण उपस्थित ऑडियन्सही चांगलाच हसायला लागला. मजेशीर असे की, रणवीर सिंह यांची काही सिक्रेट्स सांगीतल्यावर ऑडियन्सच नव्हे तर, दीपिकाही हसायला लागली.

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण या दाम्पत्याने फेमिना ब्यूटी अवॉर्ड् 2019 (Femina beauty awards2019) या कार्यक्रमात हजेरी लावली. या वेळी तिला रणवीरबाबत विचारण्यात आले. दीपिकाला रणविरबाबत विचारताच तिने खुलेपणाने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ज्या अगदी खासगी आहेत पण मजेशीर आहेत. जशा की, रणवीर खूप उशीरपर्यंत शॉवर घेतो. टॉयलेटमध्येही खूप उशीर थांबत असतो. दीपिकाने असेही सांगितले की, तो बेडरुममध्येही खूप वेळ लावतो. दीपिकाच्या या वाक्यावर उपस्थित ऑडियन्स हसायला लागला. त्यानंतर आपल्या वाक्याचा काही भलताच अर्थ मंडळींनी लावल्याचे तिच्या ध्यानात आले. मग तिने आपले वाक्य पुन्हा दुरुस्त करत सांगितले की, मला असं म्हणायचं होतं की, तो बेडवर झोपायला जायलाही खूप उशीर लावतो.

या कार्यक्रमात दीपिकाने रणवीरच्या पोषाख निवडीबाबतही सांगितले. ती म्हणाली, रणीवीर जेव्हा कोठे जाण्यासाठी कपडे निवडतो तेव्हा तो आगोदर मला दाखवतो. माझी संमती मिळाल्यानंतरच तो ते कपडे घालून निश्चित ठिकाणी जातो. (हेही वाचा, 'त्याच्यासोबत किस करताना मी अधिक खोल जाते' मिलंद सोमण यांची पत्नी Ankita Konwar हिची प्रतिक्रिया)

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

या कार्यक्रमात दीपिका ब्लॅक डीप क्लीवेज गाऊन परिधान करुन आली होती. तर, रणवीरन कलरफूल सूट परिधान केला होता. या कार्यक्रमात दीपिकाला फेमिना वुमन ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आला.