Amruta Khanvilkar Birthday: अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा हा ग्लॅमरस लूक पाहून विसरून जाल बॉलिवूडच्या तारकांना, See Pics
Amruta Khanvilkar (Photo Credits: Instagram)

Amruta Khanvilkar Birthday: इंडियाज बेस्ट (India's Best) या झी टीव्ही वरील रिअॅलिटी शो मधून या झगमगत्या दुनियेत पदार्पण करणारी अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिच्या करिअरचा प्रवास खूपच कौतुकास्पद आहे. एक उत्कृष्ट नृत्यांगणा, उत्तम अभिनेत्री आणि तितकीच देखणी या गुणांमुळे अमृताने मराठीसह हिंदी चित्रपटातही चांगला जम बसवला. अशा या ग्लॅमरस अभिनेत्रीचा आज वाढदिवस. 23 नोव्हेंबर 1984 साली अमृताचा जन्म झाला. अमृताला लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची आवड होती. गोलमाल (Golmaal) या मराठी चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. तर 'मुंबई साल्सा' (Mumbai Salsa) या चित्रपटातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. आज एक यशस्वी अभिनेत्री ते ग्लॅमरस अभिनेत्री अशी तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

अमृता जितकी साडीत सुंदर दिसते तितकाच तिचा ग्लॅमरस अंदाजही तिच्या चाहत्यांना भावतो. पाहूयात तिच्या या ग्लॅमरस अंदाजाची एक झलक

Amruta Khanvilkar (Photo Credits: Instagram)

मराठी अभिनेत्री सुद्धा ग्लॅमरस अंदाज उत्कृष्टरित्या कॅरी करू शकते हे तिने सिद्ध करुन दाखवलं. तिचा हॉट लूक चाहत्यांना प्रचंड आवडतो.

Amruta Khanvilkar (Photo Credits: Instagram)

तिने मराठीत साडे माडे तीन, गैर, नटरंग, धुसर, अर्जुन, झकास, बाजी, कट्यार काळजात घुसली यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले.हेदेखील वाचा- Sai Lokur Wedding Card: ठरलं! सई लोकुर आणि तीर्थदिप रॉय यांच्या लग्नपत्रिका आली समोर, #SAIDEEPROY म्हणत शेअर केला हा सुंदर Video

Amruta Khanvilkar (Photo Credits: Instagram)

तर हिंदीत हिंम्मतवाला, राजी, सत्यमेव जयते, फूंक, फूंक 2, मलंग अशा अनेक चित्रपटात काम केले.

Amruta Khanvilkar (Photo Credits: Instagram)

हिंदी आणि मराठी चित्रपटांसोबत तिने झलक दिख ला जा, खतरों के खिलाडी रिअॅलिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून सहभागही घेतला होता.

Amruta Khanvilkar (Photo Credits: Instagram)

त्याचप्रमाणे 2 MAD, डान्स इंडिया डान्स (Season 6), सुपर डान्सर महाराष्ट्राचा या कार्यक्रमात परीक्षक राहिली आहे.

रिअॅलिटी शो मधून आलेली एक स्पर्धक ते परीक्षक असा अमृताचा रोमांचक प्रवास आहे. अशा हा हरहुन्नरी अभिनेत्रीला लेटेस्टली मराठीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!